यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमुळे अनेकांचे पुढे येण्याचे स्वप्न उध्वस्त करून टाकले – संजय काळे
His five-year career shattered the dream of many to come forward – Sanjay Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 18.40Pm.
कोपरगाव : यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमुळे जनता यापुढे काळे कोल्हे सोडून कोणाला मतदान करणार नाही, यांनी अनेक लोकांचे पुढे येण्याचे स्वप्न उध्वस्त करून टाकले.अशी टिका सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी न घेता विजय वहाडणे यांच्यावर केली.
कोपरगाव बसस्थानक रस्त्याच्या च्या बाजूने दुमजली गाळे बांधावे अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे केल्याच्या बातमीचा संदर्भ देत संजय काळे म्हणाले, एसटी स्टँड च्या बाजूला गाळे व्हावेत हे प्रपोजल तयार करा असे मी वहाडणे यांना निवडून आल्या आल्याच सांगितले होते.परंतु यांना गेल्या पाच वर्षात काहीच करता नाही आले नाही, आता कशाचा मागण्या करतात केवळ गुड फार्मसी काम काही नाही.परंतु सर्व उपलब्ध असतानाही केवळ वादविवादात यांनी वेळ घालविला व शहरात एकही ठोस काम केले नाही. असेही ते म्हणाले
संजय काळे म्हणाले खोका शॉप चा प्रश्न मंजूर असतानाही पाच वर्षात त्यांना तेही पूर्ण करता आलं नाही. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत काळे कोल्हे यांना सपशेल डावलून मतदारांनी मिनी आमदार म्हणून विजय वहाडणे या सामान्य माणसाला राज्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन मतदारांनी शहर विकासाची संधी सामान्य दिली होती परंतु पाच वर्षाचा त्यांचा कारभार पाहता भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे कोपरगाव शहर असो की तालुका याचा भलाबुरा विकास केवळ काळे कोल्हे हेच करू शकतात ही मतदानाची ठाम भावना झाली आहे. यापुढे काळे कोल्हे सोडून लोक मतदान करणार नाहीत. सामान्य माणसाला भविष्यात अशी संधी मिळण्याची आशा मावळली असून त्यांच्या कर्तृत्वामुळे सामान्य सामान्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाल्याची खंत संजय काळे यांनी व्यक्त केली.
२८ कामाच्या नावाखाली एवढा उहापोह केला परंतु आर्थिक सेटलमेंट झाल्यानंतर बिनबोभाट ही कामे सुरू झाली. आठ दिवसांपूर्वी केलेल्या रस्त्यावरची खडी निघू लागली आहे. कामाला क्वालिटीचं नाही. असा आरोप संजय काळे यांनी केला.
चौकट
रविवारी चांदगव्हाण ला स्वच्छता अभियाना साठी गेलो असता गावकऱ्यांनी प्रश्न केला का हो तुम्ही कोपरगाव सोडून आता ग्रामीण मध्ये का आले,? तेंव्हा त्यांना मी उत्तर दिले कोपरगाव साफ झाले, तिजोरी साफ झाली, त्यामुळे आता ग्रामीण कडे आलो. – संजय काळे