निळवंडे व साठवण तळे या दोन्ही पाणी योजना पूर्ण कराव्यात – संजय सातभाई

निळवंडे व साठवण तळे या दोन्ही पाणी योजना पूर्ण कराव्यात – संजय सातभाई

Both Nilwande and Sathwan Tale water schemes should be completed – Sanjay Satbhai

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 18.50Pm.

कोपरगाव : शहराच्या वर्तमानासह भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता निळवंडे पाणी योजना व पाच नंबर साठवण तलाव या दोन्ही योजनांची आवश्यकता असून दृष्टिक्षेपात असलेल्या या दोन्ही योजना तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी आमचे प्रतिनिधी जवळ बोलताना केली.

यावर बोलताना संजय सातभाई म्हणाले, खेड्याचं निमशहर आणि निमशहराचं झपाट्याने शहरात रूपांतर होत असताना साहजिक पाण्याची गरजही वाढत आहे. वेगाने सुरू असलेलं शहरीकरण आणि त्याच्या पाण्याच्या गरजेचा प्रश्न, भेडसावत आहे. वितरण व्यवस्था व पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे शहराला आठ दिवसाआड ते २५ दिवसांआड पाणी देण्याची वेळ येते. या गोष्टी विचारात घेऊन तत्कालीन नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांनी सातत्याने पाच नंबर तळे करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. मुळात हा साठवण तलाव व्हावा. या प्रस्तावास १३ नोव्हेंबर २०१४ साली तत्कालीन नगराध्यक्ष ऐश्वर्याताई सातभाई यांनी मंजुरी दिली. होती त्यास नगरसेवक अतूल काले सूचक व अनुमोदक बबलू वाणी होते. साठवण तलावाच्या सर्वेक्षण अंदाजपत्रकासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना ४ नोव्हेंबर २०१५ रोजी पाच लाख रुपये व ८ जानेवारी २०१६ रोजी दोन लाख रुपये धनादेश दिला होता. याचा अर्थ पाच नंबर साठवण  तलावाची सुरुवात आम्ही केली, जमीन मिळवून दिली, त्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी आजपर्यंत लागणारे सर्व ठराव भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहुमताने मंजूर केलेले आहेत असेही ते म्हणाले,

संजय सातभाई म्हणाले, आ. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तळयासाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. तिकडे तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही २६० कोटीची निळवंडे पाणी योजना मंजूर करून घेतली आहे. या दोन्ही योजना कार्यान्वित झाल्या तर आणि तरच कोपरगाव शहराला दररोज स्वच्छ व नियमित किंवा दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकतो. या दोन्ही योजना पुढील पंचवीस वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून करण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्येचा विचार करता दर पाच वर्षांनी पंधरा ते वीस हजार लोकसंख्येत वाढ होत असते. त्यात नुकतीच कोपरगाव शहर हद्दवाढ झालेली आहे, येत्या पंचवीस वर्षात सुमारे एक लाख लोकसंख्या वाढ होण्याचा अंदाज आहे. या दृष्टीने पिण्याच्या पाण्याचा विचार करता या दोन्ही योजना कोपरगावसाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनेतील पाणी हक्क सोडण्याच्या जाचक अटी रद्द करून दृष्टीक्षेपात आलेल्या या दोन्ही योजना तातडीने पूर्ण कराव्यात विशेष म्हणजे या दोन्ही योजना पूर्ण करण्याची मोठी संधी आ. आशुतोष काळे यांच्या हातात आहे. आणि कोपरगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चितच मार्गी लावतील यात कुठलीही शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

चौकट

परंतु यात आरोप-प्रत्यारोप न करता व कुठलेही राजकारण न आणता सर्वांनी एकत्रितपणे यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याची मागणी शिवसेना-भाजप व नगरसेवकांनी केली आहे असेही संजय सातभाई  म्हणाले

Leave a Reply

You cannot copy content of this page