नगरपालिकेचा कत्तलखान्यात जनावरे कापली जातात- विजय वहाडणे
Animals are slaughtered in the municipal slaughterhouse – Vijay Vahadne
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 18.30Pm.
कोपरगाव :नगरपरिषदेच्या मनाई येथील स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) मध्ये नियमितपणे दररोज सरासरी ३ ते ५ म्हैसवर्गीय जनावरे कापली जातात. कोणत्या दिवशी कुणी व किती जनावरे कापली याची नोंदणीही नगरपरिषदेच्या रजिस्टरला केली जात याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
नुकतेच गोवंश हत्या बंदी समितीच्या वतीने पालिकेने काढलेल्या अतिक्रमण भागात बांधकाम होत असल्याची तक्रार केली होती या पार्श्वभूमीवर वहाडणे यांनी सदर भागाचा दौरा करून माहिती घेतली आहे.
मागील महिन्यात प्रशासनाने ज्या ठिकाणी कारवाई केली त्या ठिकाणच्या जागा मालकांनीही आम्ही पुन्हा चुकीचे काहीच करणार नाही असे आश्वासनही दिले. आम्ही काही नियमबाह्य केल्यास आमच्यावर कारवाई करा असेही कसाई व्यावसायिकांनी स्वतःहून सांगितले. स्वतःच्या जागेत ते नियमानुसार बांधकाम करून जागेचा वापर करू शकतात. त्याठिकाणी चुकीचे, नियमबाह्य काहीही सुरू नाही हेही मी बघितले. यानंतर कुणीही गोवंशहत्या करून कायदेभंग केला तरच कठोर कारवाई करण्याचेही सर्वानुमते ठरले.आम्ही काही नियमबाह्य केल्यास आमच्यावर कारवाई करा असेही कसाई व्यावसायिकांनी स्वतःहून सांगितले.
या पत्रकात वहाडणे यांनी म्हटले आहे की, मी स्वतः आज संजयनगर, बैल बाजार रोड भागात जाऊन कसाई व्यावसायिकांची मिटिंग घेतली. त्या भागात गोवंशहत्या पुर्णपणे बंद आहे हेही बघितले.
चौकट
आता तरी शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंच्या निर्लज्ज मालकांनी गाई-वासरे स्वतःच्या घरीच बांधून ठेवावीत. गाई शहरातील कचरा-कैरीबॅग खाऊन आजारी पडतात, रहदारीला अडथळा होतो, अपघात होतात याचे तरी भान ठेवावे ही अपेक्षा.- विजय वहाडणे