निळवंडेतून आणा नाहीतर दारणातून आधी वितरण व्यवस्था सुधारा-संजय काळे 

निळवंडेतून आणा नाहीतर दारणातून आधी वितरण व्यवस्था सुधारा-संजय काळे

Bring it from Nilwande or improve the distribution system first through the Darana – Sanjay Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 4 Dec.2021 19.30Pm.

 कोपरगाव : निळवंडेतून आणा नाहीतर दारणातून आधी शहराची वितरण व्यवस्था सुधारा.. मेन लाईनचे १५०० नळ जोड तोडा.. शहरातील मुद्दाम लिक ठेवलेले व्हाल बदला अशा सूचना देत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुधारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

याविषयी बोलतांना संजय काळे म्हणाले, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी कोपरगाव नगरपरिषदेला दारणा धरणातून ३.३२ दलघमी पाणी अतिरिक्त पाणी सन २०५२ च्या लोकसंख्येला दृष्टीक्षेपात ठेऊन मंजूर केले.पुर्वी कोपरगाव साठी दारणा धरणातून ५.९६ दलघमी पाणी आरक्षीत होते. त्यामुळे आता कोपरगाव शहरासाठी एकूण एक वर्षा साठी ९.२८ दलघमी पाणी प्राप्त झालेले आहे. नियमा प्रमाणे कोपरगाव शहरासाठी ६० दिवसांचा साठा असणे जरूरी आहे.. कोपरगाव शहराचे चार तळे आहेत ज्यांची कागदोपत्री साठवण क्षमता ६८१ एम. एल. आहे.. परंतु प्रत्यक्ष क्षमता ४०० एम. एल. आहे.

काळे पुढे म्हणाले,सन २०१२ मध्ये जलसंपदा विभागाने नगरपरिषदेला वर्षभरात ६११८ एम. एल. पाणी पुरवठा केला. म्हणजे सरासरी रोज १६.७६ एम. एल. प्रति दिन.. पण कोपरगाव शहराच्या जल शुध्दीकरण केंद्रात २०१२ मध्ये सरासरी रोज केवळ ९.२८ एम. एल. पाणी प्राप्त झाले.. असे नगर परिषदचे वॉटर ऑडीट मध्ये नमुद आहे.. याचा अर्थ ७. ४८ एम. एल. पाणी इतकी तुट (लॉस) आहे. सिपेज, बाष्पिभवन व सात कि मी चे वहन व्यय ४१% असल्याचे नमुद आहे.. ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद आहे. प्रत्यक्षात नगरपरिषदची साठवण क्षमता कमी असल्याची बाब ना अधिकारी, ना लोकप्रतिनिधी यांनी ऑडीटर यांचे निदर्शनास आणून दिलेली नाही.. असेही त्यांनी सांगितले.

संजय काळे म्हणाले, पाणी वाढले पण नगरपरिषदचा पाणी साठा वाढणे जरूरी आहे.. पाच नंबर तलाव वाढला तर साठवण क्षमता ४०० एम. एल. ने वाढेल.. पाणी कितीही वाढले, तरी कोपरगाव शहराची वितरण व्यवस्था सुधारणे जरूरी आहे.. वॉटर ऑडीट प्रमाणे शहराच्या वितरण व्यवस्थेत ७०% वहन व्यय तुट (लॉस) दाखविण्यात आलेली आहे.. तसेच कोपरगाव शहराला पाणी पुरवठ्यासाठी एका फे-यासाठी चार दिवस लागतात. त्यामुळे दररोज पाणी देणे हे दिवास्वप्नच राहणार आहे. कोपरगाव शहरात त्रेचाळीस कोटीच्या पाणी योजनेत ठेकेदाराने कुठे पाईप अंथरले व कुठे व्हाॅल टाकले याची नोंद नगरपरिषदेेत नाही.. पाईप टाकले कि चोरून विकलेत हे केवळ तात्कालीन मुख्याधिकारी व नगरसेवक नगराध्यक्ष यांनाच माहीती.. असेही त्यांनी म्हटले आहे

काळे पुढे म्हणाले,शासनाने कितीही पाणी मंजूर केले तरी जोपर्यंत वितरण व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत कोपरगाव शहराला पाणी असून चार ते दहा दिवस आड पाणी प्यावे लागेल.. विशेष म्हणजे आजी व माजी लोकप्रतिनिधी त्रेचाळीस कोटीच्या पाईपलाईन च्या चाचणीचा आग्रह धरीत नाही… ज्यावेळेस पाईपलाईन अंथरली गेली. त्यावेळेस नगरपरिषदेत सहमती एक्सप्रेस धावत होती.. ह्या भ्रष्टाचाराला कुणाची साथ हा संशोधनाचा विषय आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भिजत ठेऊन .. चिघळत ठेऊन जनतेला वेड्यात काढण्याचे षडयंत्र कधी थांबणार.. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 निळवंडेतून आणा नाहीतर दारणातून कोपरगाव शहराची वितरण व्यवस्था सुधारा.. मेन लाईनचे १५०० नळ जोड तोडा.. शहरातील मुद्दाम लिक ठेवलेले व्हाल बदला असे संजय काळे यांनी शेवटी पुन्हा एकदा म्हटले आहे.

चौकट

कोपरगाव शहरातील लोकसंख्या वाढत आहे. आता दारणा धरणातून ३.३२ दलघमी पाणी मंजूर झाले आहे तर तिकडे निळवंडे धरणातून ४.७५ दलघमी. आणि मंजूर केले आहे. दोन्हीकडे पिण्याचे पाणी आरक्षित झाले आहे. तेंव्हा कोपरगावला गरज व मागणीप्रमाणे पाणी मिळण्यासाठी दोन्ही योजना विनाअट सुरू होणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती आहे असे त्यांनी म्हटले आहे. शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याची संधी त्यांना आहे. तेंव्हा काळे व कोल्हे या दोघांनीही सरकार दरबारी आपले वजन वापरून या दोन्ही योजना तातडीने कशा सुरू होतील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही संजय काळे यांनी शेवटी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page