कोपरगावात पहाटे दाट धुक्याची चादर, संध्याकाळी धुळीची चादर, प्रदूषण हवेत गारवा कायम,

कोपरगावात पहाटे दाट धुक्याची चादर, संध्याकाळी धुळीची चादर, प्रदूषण हवेत गारवा कायम,

A thick sheet of fog in the morning, a sheet of dust in the evening in Kopargaon.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 5 Dec.2021 18.00Pm.

कोपरगाव :आज रविवारी पहाटे दाट धुक्यांची चादर पसरलीय. आज हवेत गारवा तर आहेच, त्याच बरोबर धुक्याची चादर ही पसरलीय. तर संध्याकाळी धुळीचे प्रदूषण हवेत गारवा आहे.

कोपरगाव संध्याकाळी धुळीची चादर

गेले तीन दिवस अवकाळी पावसानंतर ( पारा बऱ्यापैकी खाली आला असून धुरकट वातावरण निर्माण झालंय. सकाळी दृष्यमानताही कमी झाली असून इंडीकेटर देत गाड्या मार्ग काढू लागलेयत. कोपरगाव मध्ये हे प्रचंड धुके पसरल्याने आज रविवारी पहाटे पासून कोपरगावचे वातावरण आल्हाददायक वाटत होते.

 या वातावरणात मात्र पहाटे या धुक्याचा आणि थंडीचा आस्वाद घेण्यास बाहेर पडले आहेत. व्यायाम आणि जॉगिंग करण्यासाठी आणि या वातावरणात फिरण्यासाठी कोपरगावकर मोठया प्रमाणात बाहेर पडले आहेत. दुपारी काही वेळ ऊन पडल्यामुळे धुक्याची चादर निवळली असली तरी त्याची जागा संध्याकाळी शहरातील उठणाऱ्या धुळीने घेतल्यामुळे धुळीची चादर पसरली आहे. त्यामुळे पहाटे धुक्याचा अल्हाददायक आनंद घेणाऱ्या कोपरगावच्या नागरिकांना संध्याकाळी धुळीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. एका त्रस्त नागरिकांनी हे फोटो पत्रकारांना पाठवले आहेत.

कोपरगावात रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. येत्या काही दिवसात काही भागात हलक्या पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने दिवसाचा गारवा कायम आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page