कोपरगाव बाजार समितीतून ३० हजाराचे सहा क्विंटल सोयाबीन चोरी; आरोपी पकडला

कोपरगाव बाजार समितीतून ३० हजाराचे सहा क्विंटल सोयाबीन चोरी; आरोपी पकडला

Six quintals of soybean worth Rs 30,000 stolen from Kopargaon market committee; The accused was caught

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 4 Dec.2021 18.00Pm.

 कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती लिलावाच्या शेडमध्ये ठेवलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या  ६ क्विंटल (१२गोण्या) सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना  येथे घडली .

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी( २ डिसेंबर) रोजी सांय.६ वा चे सुमारास कृषीउत्पन्न बाजार समीती कोपरगाव येथील निलाव शेड मध्ये सुमारे १५० गोण्या होत्या. सदर ठिकाणी डबलसिंग करणशिंग थापा हा रात्री वॉचमन म्हणुन ड्युटीवर होते . बाजार समितीचे सचिव नानासाहेब सोपान रणशुर हे (३डिसेंबर) रोजी सकाळी ९ वा चे सुमारास कृषीउत्पन्न बाजार समीती कोपरगाव येथे आले असता त्यांना संतोष ज्ञानदेव सांगळे या व्यापारीने सदर निलाव शेड मधुन सोयाबिनच्या १२ गोण्या चोरीस गेले बाबत सांगितले. असता त्यानी सदर ठिकाणी जावुन पाहीले त्यावेळी निलाव शेडमधील सोयाबिनच्या १५० गोण्या पाकी १२ गोण्या कमी दिसल्या. सचिव रणशूर यांनी  सी.सी.टीव्ही कॅमेरा चेक केला असता ज्ञानेश्वर दादा सोनवणे या इसमाने दिनांक २ डिसेंबर च्या रात्री १० वाजे ते ३ डिसेंबर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान त्याची विना नंबरची टाटा कंपनीची छोटा हत्ती या गाडीतुन सोयाबिनच्या १२ गोण्या म्हणजे सुमारे ३० हजार रुपयेचा मुद्देमाल लबाडीच्या ईराद्याने स्वतःचे फायदे करता चोरुन नेताना आढळून आला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब सोपान रणशुर फिर्यादीत त्यानी म्हंटले आहे.  सचिव रणशूर यांच्या फिर्यादीवरून  ज्ञानेश्वर दादा सोनवणे रा. धारणगाव ता. कोपरगाव यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढिल तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्टॅबल तिकोने हे करत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page