चांदेकसारे ऐडंकी शिवारात बिबट्याने बोकड मारला
In Chandeksare Adanki Shivara, a leopard killed a goat
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 5 Dec.2021 18.20Pm.
कोपरगाव : रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत बोकड मारून बाळासाहेब खरे व सौ संगीता खरे यांच्या समोरून उसाच्या शेतात फरफटत नेला. रात्री बिबट्याच्या दर्शनाने खरे कुटुंब भयभीत झाले. रात्र कशीबशी काढून सकाळी त्यांनी झालेली घटना शेजारीच असलेले कल्याण होन यांना सांगितली.
तालुक्यातील चांदेकसारे ऐडंकी परिसरात बिबट्याचा वावर गेल्या महिन्यापासून असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या शेळ्या मेंढ्या कोंबड्या व पाळीव कुत्री या बिबट्याचे शिकार करून फक्त केली आहे.
सदर परिसरात मसोबा वस्ती शाळा असल्याने पालकांच्या मनातही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी मोठी घबराट निर्माण झाली असून कल्याण होन, बाळासाहेब खरे, बाळासाहेब खर्से, मनराज होन, लक्ष्मण होन ,आप्पासाहेब होन ,धर्मा होन, दादासाहेब होन, चंद्रकांत होन या ऐडंकी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या बिबट्याने अनेक वेळा शिकार केली असल्याचे सांगितले. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कल्याण होन यांनी वन विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क केला असून वन विभागाने त्वरित या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी त्यांच्या सह स्थानिक नागरिकांनी केली आहे.