दोन वर्षात भरघोस निधी दिला, येणाऱ्या निवडणुकीत पाठबळ द्या :- आ. आशुतोष काळे

दोन वर्षात भरघोस निधी दिला, येणाऱ्या निवडणुकीत पाठबळ द्या :- आ. आशुतोष काळे

Gave a lot of funds in two years, give support in the coming elections: – Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 5 Dec.2021 18.30Pm.

कोपरगाव : दोन वर्षात प्रतिकूल परिस्थितीत मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणून दिला आहे. त्यामुळे विकासाची कामे शिल्लक राहणार नाही याची काळजी मी घेत आहे. तुम्ही देखील आजवर मला दिलेलं पाठबळ येणाऱ्या सर्वच निवडणुकात द्या असे आवाहन साई संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी टाकळी येथे केले.

यावेळी भाजपा कोल्हे गटाचे आण्णासाहेब देवकर, राजेंद्र गायकवाड, श्रावण शिलावंत आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

आ. आशुतोष काळे म्हणाले की, सत्ता असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समितीत देखील निधी आणून विकास साधला जावू शकतो हे आपण मागील पाच वर्षात अनुभवले आहे. त्यामुळे सत्ता असणे आवश्यक आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.तेंव्हा विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील पाठबळ द्या, तुमच्या विकासाच्या अपेक्षा देखील पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी अर्जुन काळे, अनिल कदम, श्रावण आसने, पद्माकांत कुदळे, विठ्ठलराव आसने, अशोकमामा काळे, कारभारी आगवण, भास्करराव मांजरे, भागवतराव देवकर, भाऊसाहेब देवकर, छगणराव देवकर, चारुदत्त सिनगर, नानासाहेब चौधरी, सुभाष दवंगे, अशोकराव देवकर, सांडूभाई पठाण, नारायणराव बर्डे, लालूमामा शेख, नामदेव देवकर, शशिकांत देवकर, ज्ञानेश्वर देवकर, अमोल परदेशी, प्रताप देवकर, गोरख देवकर, बाळासाहेब पाईक, श्रावण शिलावंत, सोमनाथ देवकर, बाळासाहेब देवकर, गणेश पळसकर, नानासाहेब दवंगे, रामदास रणशूर, रावसाहेब चौधरी, निखील जाधव, सचिन चौधरी, राजेंद्र जाधव, आण्णासाहेब जाधव, शिवाजी कदम, वाल्मीक शिंदे, इक्बाल तांबोळी, सनी आव्हाड, संजय परदेशी, राजेंद्र गायकवाड, वैभव घोंगटे, बाबासाहेब आसने, भाऊसाहेब सांगळे, मंगल परदेशी, गणेश देवकर, संभाजीराव देवकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :- मागील दोन वर्षापासून आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून विकास दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही आ. आशुतोष काळे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकत्यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page