कोविड लस नाही, तर प्रवेश नाही तहसीलदार बोरुडे यांचा आदेश
Tehsildar Borude’s order not to vaccinate but not to enter
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 7 Dec.2021 19.30Pm.
कोपरगाव: शहर व परिसरातील सर्व नागरिक दुकानदार किराणा व्यापारी आवश्यक व इतर आस्थापना मालक पेट्रोल पंप मालक.. सर्व संस्था यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तींनी लस घेतली असल्यासच त्या व्यक्तीला आपल्या आस्था पणा मध्ये प्रवेश द्यावा अन्यथा आपल्या आस्थापणेला वरील आदेशात नमूद प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस सामोरे जावे लागेल असे पत्रक तहसीलदार विजय बोरुडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
कोविड अनुरूप वर्तन Covid appropriate behaviour चे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास आपली आस्थापना सील करण्यात येईल . तसेच आपण सर्वांनी लसीकरण प्रमाणपत्र स्वतः जवळ बाळगणे बंधनकारक राहील. आपले कडे कामावर असलेले मजूर/ कर्मचारी यांचे कडे देखील लसीकरण प्रमाणपत्र असले च पाहिजे… अन्यथा आपल्या आस्थापणेला वरील आदेशात नमूद प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस सामोरे जावे लागेल.. Omicron/ corona पासून बचाव करण्या करिता आपल्या कोपरगाव मधील सर्व १००% नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे… प्रशासन गावोगावी तसेच प्रत्येक प्रभागात लसीकरण सत्र आयोजित करत आहे कोणी कुठेही लस घेऊ शकतो.. लस न घेणाऱ्या नागरिकांना या पुढे रेशन दुकान .. पेट्रोल पंप .. शासकीय कार्यालये व इतर आवश्यक आस्थापना मध्ये प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद कृपया घ्यावी. असे शेवटी पत्रकातून नमूद केले आहे.