राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमीत्त जपानुष्ठाण सोहळा
Japanustan ceremony on the occasion of the 32nd death anniversary of Rashtrasant Janardan Swami
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 8 Dec.2021 19.30Pm.
कोपरगांव : कोपरगांव बेट राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचा बत्तीसावा पुण्यतिथी सोहळा समाधीस्थानी ९ ते १६ डिसेंबर दरम्यान आयोजित केला असून भाविकांचा याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर व मठाधिपती विश्वस्थ प पू. रमेशगिरी महाराज यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी वाराणशी येथील जुना पंचदशनाम आखाडयाचे अखिल भारतीय आखाडा परिषदचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महामंत्री महंत स्वामी हरिगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पुण्यतिथी काळात दररोज पहाटे ५ ते ६ नित्यनियम विधी ६ ते प्रवचन सकाळी ८.३० ते ११ गुरूचरित्र ग्रंथाचे सामुदायीक पारायण, १० वाजता ज्ञानसत्र ७ सत्संग प्रवचन दुपारी ४ व रात्री ९ वाजता प्रवचन सत्संग, सायंकाळी ७.३० वाजता आरती आदि धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपुर्ण सप्ताह काळात हभप गुरूवर्य भास्करगिरी महाराज, हभप रघुनाथजी खटाणे महाराज, हभप अरूणगिरी महाराज, हभप राजेंद्रगिरी महाराज आदि संत महंत सदिच्छा भेटी देणार आहेत. तर स्वामीजी पालखी मिरवणुक (९ डिसेंबर) मुक्ताई ज्ञानपिठ पुणतांबा येथील हभप रामानंदगिरी महाराज (१० डिसेंबर), हभप भानुदास बैरागी (११ डिसेंबर), नेवासा येथील हभप उध्दव महाराज मंडलिक (१२ डिसेंबर), आळंदी देवाची येथील हभप गुरूवर्य पंडीत महाराज क्षीरसागर (१२ डिसेंबर), सारेगम व झी वाहिनीचे हभप ज्ञानेश्वर महाराज मेश्राम (१३ डिसेंबर), पेंडेफळ येथील हभप बाळा महाराज आहेर (१४ डिसेंबर) सरालाबेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज (१५ डिसेंबर) यांची प्रवचने, किर्तने होतील. १० ते १५ डिसेंबर याकाळात रोज सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप किशोरजी महाराज खरात यांचे श्रीमदभगवतीगिता भक्तीयोग बाराव्या अध्यावर निरूपण होईल.
१६ डिसेंबर रोजी जनार्दन स्वामी पुण्यतिथी दिनी पहाटे ३.३० समाधी महापुजा. पहाटे ४ वाजता नित्यनियम विधी पठण, पहाटे ५ वाजता काकडा, सकाळी ९ ते १२ स्वामींच्या पादुका व सत्संग तर दुपारी साडेबारा वाजता आमटी भाकरीचा महाप्रसादांने या उत्सवाची सांगता होईल.
वरील सर्व कार्यक्रम हे कोविड शासकीय नियमांचे पालन करूनच पार पाडले जात आहेत.