कोपरगाव शहर पोलिस; सव्वा लाखाच्या सोनसाखळ्या महिलांना परत केल्या,
Kopargaon City Police; A one lakh 20 thousant gold chains returned to women,
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 7 Dec.2021 19.20Pm.
कोपरगाव : शहरात वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेणाऱ्या चोरांना अटक त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या एक लाख वीस हजारांच्या सोनसाखळ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हस्ते गळ्यात घालून महिलांना कोपरगाव शहर पोलिसांनी परत केल्या अशी माहिती शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पत्रकारांना दिली. दागिन्यांची आशा सोडलेल्या महिलांना दागिने परत करताच महिलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली आहे. नागेश राजेंद्र काळे राहणार वडाळा महादेव ,सोड्या उर्फ आदित्य उर्फ गणेश पिंगळे राहणार अशोक नगर कारखाना , संदीप दादा हरी काळे वय (३२) वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर व लहू बारकू काळे वय (२०) राहणार पळसे कारखाना जिल्हा नाशिक अशी चार आरोपींची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:२० चे सुमारास फिर्यादी श्रीमती संगीता गणेश देशमुख वय (५४) वर्षे धंदा नोकरी रा.साईनगर, कोपरगाव ता. कोपरगाव जि अहमदनगर या डॉ. सी एम मेहता विद्यालयात पार्कींग मध्ये त्यांची स्कुटी पार्कींग करीत असतांना अचानक दोन आरोपींनी मोटार सायकलवर जवळ येवुन मोटार सायकलवरील पाठीमागील बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळयातील मंगळसुत्र मिनी गंठन ६००००/-रु किमतीचे बळजबरीने हिसकावून चोरुन पळुन घेवुन गेले होते.
त्यांचे फिर्यादीवरुन शहर पोस्टे गु रजि. नबर २९३/२०२१ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तसेच दिनांक ३ ऑक्टोबर रोजी ८.३० वा चे सुमारास फिर्यादी पुजा किशोर ओढेकर वय (२९) वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. प्राजक्ता सदन काळेमळा, पुनम टॉकीमागे, कोपरगाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळया जवळुन मॉर्निंग वाक करुन परत येत असतांना रस्ता पार करण्यासाठी रस्त्याचे बाजुला उभे असतांना त्यांचे पाठीमागुन विना नंबरची काळया रंगाची बजाज पल्सर मोटार सायकलवर दोन आरोपींनी अचानक जवळ येवुन फिर्यादीचे गळयातील ६०,०००/-रु किमतीची सोन्याची पोत १४.९ ग्रॅम वजनाची बळजबरीने हिसकावून चोरुन घेवून पळून गेले होते.
त्यावरुन कोपरगाव शहर पोस्टे गु रजि नंबर ३००/२०२१ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.वरील प्रमाणे दोन्ही गुन्हे करण्याची पध्दत एकसारखी असुन दोन्ही गुन्हे करणारे आरोपी हे एकच असल्याचे संशय असल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे , उपविभागिय पोलीस अधिकारी शिर्डी संजय सातव . नगर अखिल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, व त्यांची टिम तसेच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, शहर पोलीस स्टेशन व पोलीस स्टाफ अशांनी आरोपीचा कसोशीने शोध घेवून सदर गुन्हयातील आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचेकडेस तपास करुन शहर पोलीस स्टेशन ला दाखल असलेले दोन्ही गुन्ह्याचा गेलेला माल मनी मंगळसुत्र मिनीगंठन व सोन्याची पोत असा एकुण १ लाख २० रु. चा मुद्येमाल हस्तगत करुन आज दिनांक ७ डिसेंबर रोजी दोन्ही गुन्हयातील तक्रारदार महिलांच्या ताब्यात दिला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई ठोंबरे हे करीत आहेत.