कोपरगावात कार्यकालाच्या अंतिम टप्प्यात रस्त्यांच्या कामांना ऊत – संजय काळे

कोपरगावात कार्यकालाच्या अंतिम टप्प्यात रस्त्यांच्या कामांना ऊत – संजय काळे

In the last phase of his tenure in Kopargaon, he started road works – Sanjay Kale

जिल्हाधिकाऱ्याकडे निकृष्ट कामाच्या तक्रारी नोंदवाReport inferior work to the Collector

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 8 Dec.2021 20.00Pm.

कोपरगाव : नगरपरिषदेने अनेक रस्यांची कामे वेगाने सुरू केली आहेत या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मागील सदस्य मंडळाच्या पंचवार्षिक कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात कोपरगाव शहरात रस्त्यांच्या कामांना ऊत आला असल्याची बोचरी टीका केली आहे.

संजय काळे पुढे म्हणाले रस्त्यांचे डांबरीकरण पहिल्याच पावसात उखडणार व शहर पुढील पाच वर्षासाठी खड्डेयुक्त राहणार यात शंकाच नाही आता रस्त्याची कामे निकृष्ट झाले किंवा होत आहेत.त्यात काँक्रीटवर डांबरीकरण हा अभिनव प्रयोग चालू आहे.जे रस्ते डांबरी झाले त्यांची खडी आताच निघू लागली आहे.डांबर व खडीचा विवाहानंतर काही तासात घटस्फोट सुरू झाला आहे. कारण शहरांमध्ये मोकाट जनावरे फार आहेत त्यांच्या शेणामुळे खडीला डांबर धरून राहत नाही असा मिस्कील टोला काळे यांनी लगावला आहे.

किमान काही दिवसासाठी गाव खड्डेमुक्त व धुळ मुक्त होणार याचे जनतेत नेहमीप्रमाणे समाधान असल्याचे दिसून येत आहे. डांबरीकरण पाहीले तर रस्ते खरबूडे आहेत.. खडी मध्ये गॅप आहे.. त्या गॅप मध्ये माती बसणार व वाहन गेल्यावर धुराडा उठणार यातून मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी यांना कोपरगावचा धुळगाव हा लौकीक घालवायचा नाही असे दिसते. अशी टीका त्यांनी केली.

काळे म्हणाले, स्वत: गेली १५ वर्षे रस्ते झाल्यावर गुणवत्तेची तक्रार करीत आहे. पण निवडणूकीत मी काम केले हे दाखवणे यासाठी सर्वांचा आटापीटा चालू आहे.कोपरगावात रस्ते खराब असल्यामुळे बाजारपेठेत गिऱ्हाईक येत नाही. बाजारपेठ ओस पडली. संदर्भात चालू नगरसेवक नगराध्यक्ष किंवा होऊ घातलेला नगरसेवक बोलत नाही, बोलणार नाही.

कोपरगावच्या नागरिकांनो नंतर रडत व कुढत बसण्यापेक्षा न्यायासाठी सहनशीलता सोडा, निकृष्ट कामासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रारी करा. असे आवाहन संजय काळे यांनी शेवटी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page