कोपरगावला प्रती बारामती करण्यासाठी घराघरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे – जितेन सरडे

कोपरगावला प्रती बारामती करण्यासाठी घराघरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे – जितेन सरडे

To make Kopargaon a copy of Baramati, a NCP worker should be formed from house to house – Jiten Sarde

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 8 Dec.2021 19.50Pm.

कोपरगाव: १७ ऑक्टोबर २०१९ च्या  साताऱ्याच्या  सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी धो-धो पावसात भाषण केले.ऐतिहासिक ठरलेली हि सभा शेतकऱ्यांच्या बांधापासून माता-भगिनींच्या चुलीपर्यंत पोहोचली. त्यामुळे राष्ट्रवादीचे ५५ आमदार निवडून आले यामध्ये १२ विरुद्ध शून्यच्या वल्गना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार शरद पवारांनी निवडून आणले. हि राष्ट्रवादीची खरी ताकद आहे. तुमच्यामागे आ. आशुतोष काळे यांच्यासारखा आदर्श लोकप्रतिनिधी उभा असून कोपरगावला प्रती बारामती करण्यासाठी घराघरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे यांनी केले. अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे होते.

   यावेळी  जितेन सरडे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांना पवार साहेबांनी मोठ केलं ती माणस पवार साहेबांना सोडून चालली होती. तरी देखील पवारांनी त्यांच्या बद्दल चकार शब्द काढला नाही. पवार साहेब एकटे पडले असतांना प्रसार माध्यमांनी १५ ते २० जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील असे चित्र रंगविले होते. त्यावेळी पवार साहेबांनी महाराष्ट्रभर प्रचार सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे यश मिळाले आहे ते यश फक्त पवारांमुळेच मिळाले आहे. साईबाबांची सेवा करण्याची संधी कुणालाही मिळत नाही. आ. आशुतोष काळे यांनी जनसामान्यांची सेवा केल्यामुळे त्यांना साईबाबांची सेवा करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. साईबाबांची सेवा करायला मिळाली हे कोपरगावकरांचे भाग्य असून येणाऱ्या नगरपरिषद, सार्वजनिक संस्थानच्या निवडणुकीत  राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून द्या असे आवाहन केले.           

याप्रसंगी सर्व संचालक मंडळ, पंचायत समित, तसेच जिल्हा परिषद सदस्य,  नगरसेवक,  सर्व सेलचे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.               

Leave a Reply

You cannot copy content of this page