नावातच समानता असलेल्या समता पतसंस्थेची सेवा आदर्शवत – विद्याधर अनास्कर
The service of Samata Patsanstha, which is similar in name only, is ideal – Vidyadhar Anaskar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun19 Dec.2021 18.00Pm.
कोपरगाव : सहकारातून समृध्दी कडे या प्रमाणे काकांनी समता पतसंस्थेला पण आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनविले असून समताच्या नावातच समानता असल्यामुळे ग्राहकांना पत निर्माण करून देणा-या समता पतसंस्थेची सेवा आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार राज्य सहकारी परिषद अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी शनिवारी (१८) रोजी कोपरगाव येथील समता पतसंस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीत सत्कार प्रसंगी व्यक्त केले .
समता लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंड हे समताचे एक अभेद्य सुरक्षा कवच आहे. म्हणूनच समताच्या ९९.०९% ठेवी सुरक्षित आहेत. असेही ते म्हणाले, विद्याधर अनास्कर पुढे म्हणाले की, कितीही मोठे व्हा पण बँका बनू नका तर ज्यांना पत नाही त्यांना कर्ज देऊन पत निर्माण करून देणाऱ्या पतसंस्था बना कारण आज पतसंस्थानीच सामान्य व गरजू नागरिकांना कर्ज देऊन आर्थिक स्थिरता प्राप्त करून दिली आहे. यात समताने देखील नावलौकिक मिळविला असून धनादेश पुस्तक (चेक बुक) ची सुविधा ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला तर समताच्या प्रगतीत अजून एक नवीन पाऊल पडेल. यावेळी चेअरमन काका कोयटे म्हणाले ,सहकार चळवळीत सर्वोच्च स्थानी असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री विद्याधर अनास्कर.स्वतःजवळ राज्यमंत्री पदाचा दर्जा असताना देखील कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता अडचणीत असणाऱ्या बँकांना सुखरूप बाहेर काढणे ही कला यांच्याकडे असून ते बँका, पतसंस्थांना मार्गदर्शन करत असतात त्यामुळे सहकारातील आदर्श व्यक्तिमत्वाने समताची सदिच्छा भेट घेणे ही आम्हा समता परिवारासाठी आभिमानाची बाब आहे. ठोळे उद्योग समूहाचे कैलास ठोळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. विद्याधर अनास्कर यांनी फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, व्हॉऊचरलेस पद्धत, समता क्यु.आर.कोड, ऑनलाईन समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभागाची कार्यप्रणाली विषयी संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सविस्तर माहिती दिली तर समताच्या सहकार उद्योग मंदिरातील अगरबत्ती,कापूर,समई वाती,वस्त्र निर्मितीची माहिती कु रेणुका मुन्शी यांनी दिली. यावेळी विद्याधर अनास्कर, सुरेश वाबळे, काका कोयटे यांचा सत्कार केला. प्रसिद्ध कायदे तज्ञ श्याम क्षीरसागर, रामचंद्र बागरेचा अरविंद पटेल, जितुभाई शहा,कचरू मोकळ, गुलशन होडे,संदीप कोयटे,किरण शिरोडे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन आभार संचालक संदीप कोयटे यांनी मानले.