विकासाला विरोध करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना सत्तेपासून दूर ठेवा – आ. आशुतोष काळे
Keep the destructive tendencies that oppose development away from power – Mla. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Dec.2021 20.00Pm.
कोपरगाव : नगरपालिकेत आमच्या सात नगरसेवकांनी नेहमी विकासाच्या बाजूनी साथ दिली आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी विकासाला विरोध करून नागरिकांचा विश्वासघात केला. अशा विकासाला विरोध करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना सत्तेपासून दूर ठेवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत निवडून द्या असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी शहरातील विविध प्रभागातील कामांच्या प्रसंगी केले आहे.यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थित होते.
आशुतोष काळे पुढे म्हणाले की , महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे व पुढील काळात देखील जेवढा जास्त निधी आणता येईल. मागील सहा महिन्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी शहरविकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांना परवानगी दिली असतांना देखील न्यायालयात जावून विकासकामांना स्थगिती मिळवून शहरवासियांना विकासापासून वंचित ठेवले आहे. नागरिकांना खड्ड्यातून जावे लागले, धुळीचा त्रास सहन करावा लागला. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे जनतेचे हाल झाले. विकासासाठी आलेला निधी खर्च करू शकत नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता घरी बसवा असे त्यांनी सांगितले.
यावेळी धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा कहार, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, डॉ. अजय गर्जे, संदीप रोहमारे, कृष्णा आढाव, सौ. रेखा जगताप, फकिर कुरेशी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, सचिन परदेशी, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, वाल्मीक लहिरे, धनंजय कहार, डॉ. आतिष काळे, आकाश डागा, ऋषिकेश खैरनार, दिनेश पवार, विकास बेंद्रे, संदीप देवळालीकर, विलास आव्हाड, इम्तियाज अत्तार, अंबादास वडांगळे, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, विलास आव्हाड, योगेश नरोडे, मनोज नरोडे, संतोष शेजवळ, भाऊसाहेब भाबड, श्रेणीक बोरा, महेश उदावंत, बापू वढणे, रोशन शेजवळ, हारूण शेख, प्रसाद उदावंत, रामदास केकाण, नानासाहेब देवकर, अखिल चोपदार, चांदभाई पठाण, अय्युब कच्छी, विकास आव्हाड, उमेश दीक्षित, विजय दाभाडे, दिपक देशमुख, अकिल चोपदार, दिनेश संत,आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





