खेळातुन घडते उत्तम व्यक्तिमत्व  – कुलगुरू डाॅ. नितिन करमळकर

खेळातुन घडते उत्तम व्यक्तिमत्व  – कुलगुरू डाॅ. नितिन करमळकर

Great personality through sports – Vice-Chancellor Dr. Nitin Karmalkar

पश्चिम  विभाग अंतर विद्यापीठ व्हॉलीबाॅल (मुली) स्पर्धाWest Division Inter University Volleyball (Girls) Competition

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon20 Dec.2021 18.00Pm.

कोपरगांव: खेळातुन उत्तम व्यक्तिमतव घडते. बहुआयामी व्यक्तिमत्वासाठी खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. सुखमय परीस्थितीमधुन बाहेर पडून वास्तव परीस्थितीशी अथवा नव्याने  उपस्थित होणाऱ्या  घटनांना सामोरे जाताना सकारात्मक दृष्टीकोनातून  पाहिल्यास आत्मविश्वास  बळावतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितिन करमळकर यांनी केले.

संजीवनी काॅलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पश्चिम  विभाग अंतर विद्यापीठ व्हॉलीबाॅल (मुली) स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अध्यक्ष स्थानावरून डाॅ. करमळकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, विद्यापीठाच्या खेळ आणि शारीरिक शिक्षण  मंडळाचे डायरेक्टर डाॅ. दिपक माने, अहमदनगर जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष प्रा. भास्कर शेळके, संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष  नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित काल्हे, सचिव ए. डी. अंत्रे, काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थांचे प्राचार्य, आदि उपस्थित होते.

महाराष्ट्र , गुजरात, मध्यप्रदेश , राजस्थान व गोवा राज्यातील सुमारे ४५ विद्यापीठांच्या मुलींच्या व्हाॅलीबाॅल संघाने या स्पर्धांसाठी हजेरी लावली. या सर्व खेळाडूंची चहा , नास्था , जेवण, निवास, इत्याइी व्यवस्था करण्यात आलेली आहे.                  

 डाॅ. करमळकर यांनी पुढे बोलताना सांगितले की स्पर्धांच्या निमित्ताने खेळाडू एकत्र येवुन परस्परातील संस्कृतीची देवान घेवान होते, यातुन बरेच काही नवीन शिकायला मिळते. संस्थापक शंकरराव  कोल्हे १९५३ साली वयाच्या २४  व्या वर्षी  उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तेथिल आधुनिक शेती , शिक्षण  इत्यादी बाबींनी त्यांना अस्वस्थ केले आणि ते एक आशादायी स्वप्न घेवुन मायदेशी  परतले. सहकाराच्या माध्यमातुन साखर कारखाना, बॅन्क, पतसंस्था, दुग्ध व्यवसाय, आदी आस्थापना उभ्या केल्या आणि आज देश  पातळीवर या संस्थांचा नावलौकिक आहे.  क्षेत्रातील अभ्यास करण्याची संधी सुध्दा खेळाडूंना उपलब्ध झाली आहे, खेळाडूंनी या संधीचा सुध्दा फायदा घ्यावा, असे डाॅ. करमळकर शेवटी म्हणाले.        

अमित कोल्हे म्हणाले की अभ्यासक्रमा बरोबरच संजीवनी मध्ये खेळाला विशेष  प्राधान्य देण्यात येते. खेळातुन मान अपमान सहन करण्याची क्षमता निर्माण होवुन जे खेळाडू असतात, ते जीवनात नेहमीच यशस्वी होतात. हार-जीत पेक्षाही आपण खेळातुन काय बोध घेवुन जातो, तो ठेवा आयुष्यभर  उपयोगी पडतो, असे सांगुन त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.          

प्रा.  साहेबराव दवंगे यांनी सुत्रसंचालन केले तर डायरेक्टर  डी. एन. सांगळे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page