नांदूर मधमेश्वर अभयारण्यात पर्यटकांना येण्यास बंदी

नांदूर मधमेश्वर अभयारण्यात पर्यटकांना येण्यास बंदी

Tourists are not allowed in Nandur Madhameshwar Sanctuary

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 20.00Pm.

कोपरगाव :  कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता निफाड तालुक्यातील वन विभाग वन्यजीव विभागा च्या वतीने शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत नांदूर मधमेश्वर अभयारण्यात पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.

 राज्य शासनाने वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व पर्यटनस्थळावर बंदी आदेश जारी केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर नांदूर मधमेश्वर अभयारण्य देखील पर्यटकांना आता पक्षी पाहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. हिवाळ्याच्या हंगामात नांदूर मधमेश्वर अभयारण्यात नो एंट्री लावल्याने पक्षीप्रेमी नागरिकात नैराश्याचे वातावरण पसरले आहे. कोरोना आत्ताच थोडाफार कमी होत असताना पुन्हा त्याने उसळी घेतल्याने हा निर्णय शासनाला घ्यावा लागला. मात्र आता कुठेतरी पक्षी निरीक्षण करण्यासाठी नागरिक पर्यटक येत होते, अभयारण्य फुलू पाहत होते स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत होता, मात्र कोरोनामुळे तोही हिरावून घेतला जात आहे. रामसर चा दर्जा प्राप्त झालेले नांदूर मधमेश्वर  अभयारण्यात थंडीच्या मोसमात देश-विदेशातून ३० हजारांच्यावर पक्षी या परिसरात आले आहेत.           

चौकट                                           

नांदूर मधमेश्वर अभयारण्यात गेल्या तीन महिन्यात सात ते साडेसात हजार पर्यटक येऊन पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेतला होता, त्यांच्या माध्यमातून शासनाला दोन लाख ८५ हजार रुपये महसूल मिळाला होता ,आता नांदूर मधमेश्वर अभयारण्य पर्यटकांना बंद केल्याने त्यावरही टाच येणार आहे त्यामुळे शासनाचेही मोठे नुकसान आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page