मुर्शतपुर शिवारात फुले भारती उन्हाळी भुईमुग वाणाचे प्रात्याक्षिक
Demonstration of Phule Bharati summer groundnut variety in Murshatpur Shivara
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 14Jan.2022 16.30Pm. मकर संक्रात हार्दीक शुभेच्छा !
कोपरगांव : मकरसंक्रांत पर्वानिमीत्त फुले भारती उन्हाळी भूईमुग वाणाचे लागवड प्रात्याक्षीक कार्यक्रम अखिल भारतीय तेलबिया संशोधन केंद्र जुनागड, तेलबिया संशोधन केंद्र जळगांव, व कोपरगांव तालुका कृषि विभाग सहकार्याने घेण्यात आला तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांच्या हस्ते शेतक-यांना उन्हाळी भुईमुग निविष्ठांचे यावेळी वाटप करण्यांत आले.मुर्शतपुर येथील प्रगतशिल शेतकरी रामदास शिंदे यांच्या वस्तीवर हा कार्यक्रम घेण्यांत आला. अध्यक्षस्थानी कृषि विस्तार प्रवर्तक पोपटराव खंडागळे होते.
प्रारंभी कृषि अधिकारी अविनाश चंदन, कृषि पर्ववेक्षक राजेंद्र तुंभारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी उन्हाळी सोयाबीन, हरभरा, कांदा, गहु लागवड व उत्पादन याविषयी माहिती दिली.
श्री. पोपटराव खंडागळे अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले की, शेतक-याचे प्रति एकरी उत्पादन वाढले पाहिजे. पीक बदल व शाश्वत मृदा संवर्धनाने काय फायदा होतो तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत फुले भारती उन्हाळी भूईमुग वाणाची प्रत्येकी दहा गुंठे क्षेत्रातील बीज प्रक्रिया लागवड, पाणी, खत व्यवस्थापन त्याचप्रमाणे गादीवाफयावर दीड फुट सरी घेवुन ३ सेंटीमिटर खोल व दोन झाडांमध्ये १० सेंटीमिटर अंतर लागवड याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. फुले भारती उन्हाळी भुईमुगावर आठ वर्षे संशोधन करण्यांत आले त्यातुन इतर पिकापेक्षा यात ५३ टक्के तेल व ३१ टकके उत्पादन वाढ प्रयोगाअंती निरीक्षण नोंदले गेले. काही शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पादन वाढ कशा पद्धतीने मिळाले याचे अनुभव सांगितले. यावेळी प्रगतशिल शेतकरी सर्वश्री हरिभाऊ शिंदे, सुनिल दवंगे, कैलास शिंदे, सचिन शिंदे, साहेबराव उगले, जालिंदर शिंदे, आप्पासाहेब शिंदे, सुधाकर शिंदे, दिलीप शिंदे, संजय उगले, गणेश शिंदे, काका शिंदे यांच्या शंकांचे निरसन करण्यांत आले. शेवटी कृषी सहायक संगिता सोळसे यांनी आभार मानले.
Post Views:
453