शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य घडविण्यांत शूरवीर संभाजीराजेंचे मोलाचे योगदान-सौ.स्नेहलता कोल्हे

शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य घडविण्यांत शूरवीर संभाजीराजेंचे मोलाचे योगदान-सौ.स्नेहलता कोल्हे

Valuable contribution of knight Sambhaji Raje in making Swarajya intended for Shivaraya – Mrs. Snehalta Kolhe

धर्मवीर संभाजीराजेंचा राज्याभिषेक दिनCoronation day of Dharmaveer Sambhaji Raje

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 16Jan.2022 17.30Pm.

कोपरगांव :  स्वराज्य आणि धर्मनिष्ठा जोपासुन शुरविर संभाजीराजेंनी मुघल साम्राज्याशी कडवी झुंज देत १२० युद्ध  खेळून ती जिंकली आणि मराठेशाहीचे अस्तित्व अबाधीत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यांत शूरवीर संभाजीराजे यांनी मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिनी केले.

प्रास्ताविक भायुमोचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी केले.

सौ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, शुरवीर संभाजीराजे यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी  छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार अनुभवयाला मिळाला. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहीला होता. केशवभट आणि उमाजी पंडीतांच्या तालमीत त्यांचे शिक्षण झाले. परकीय लेखकांनीही त्यांच्या युद्धनितीची वाहवा केली. गागाभट यांच्याकरवी त्यांनी नितीमुल्यांची शिकवण देणारा समयनय ग्रंथ लिहून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजीराजेंनी चिंचवड मोरगांव गणपती सज्जनगड, चाफल, हिंगणवाडी आदि देवस्थानांची देखभाल करत धर्म जोपासण्यांचे महान काम केले असे त्या म्हणाल्या. 

या प्रसंगी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,भाजपा गटनेते रविंद्र पाठक, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय  आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष .विजय वाजे,युवा मोर्चा शहराध्यक्ष  पाठक, बाळासाहेब आढाव,वैभव आढाव,  जितेंद्र रणशूर गोपी गायकवाड,रवींद्र रोहमारे, अल्ताफभाई कुरेशी,प्रसाद आढाव, निलेश बो-हाडे, शेतकरी सेलचे अध्यक्ष सतिष रानोडे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष खालीक कुरेशी,प्रभूदास पाखरे,अजय सुपेकर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य,महिला भगिनी,युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page