इंडियन आर्मी डे : समता पतसंस्थेकडून माजी सैनिकांना ठेवींवर अर्धा टक्के जादा व्याज -काका कोयटे
Indian Army Day: Samata Patsanstha offers half a percent extra interest on deposits to ex-servicemen – Kaka koyte
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 15Jan.2022 17.30Pm.
कोपरगाव : १५ जानेवारी भारतीय सेना दिवस (इंडियन आर्मी डे) निमित्त समता नागरी सहकारी पतसंस्थेने कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन च्या माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या ठेवींना अर्धा टक्का जादा व्याजदर जाहीर केला असल्याची माहिती समता पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन काका कोयटे यांनी दिली आहे . ही योजना २६ जानेवारी नंतर समता पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत देशातील सर्व माजी सैनिकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन चे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुती कोपरे, सदस्य बाळासाहेब वाघ,मधुकर इनामके, पंकज झावरे,रामनाथ वर्पे आदींचा काका कोयटे यांनी समता महिला बचत गटाच्या अगरबत्ती व कापूर यांचा गुच्छ देऊन सन्मान केला.
काका कोयटे पुढे म्हणाले की, समता पतसंस्था महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्तीपासून ते प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांपर्यंत समताच्या वेगवेगळ्या योजना,उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेली असून त्यांना विश्वास आणि सुरक्षितता व सभासदांना सेवा देत असतो.
युवराज गांगवे म्हणाले की, आम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत भारत देशाचे संरक्षण करत असतो अनेक जवानांना देशासाठी शाहिद ही व्हावे लागते पण सेवानिवृत्तीनंतर नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या समस्यांचा विचार करून समता पतसंस्थेने आम्हा भारतातील सेवा निवृत्त सैनिकांना आजच्या दिवशी ठेवींवर अर्धा टक्का आकर्षक व्याजदर जाहीर करून या दिवसाची भेटच दिली आहे.माजी सैनिकांना आकर्षक व्याजदर देणारी सहकारातील समता पतसंस्था ही पहिलीच पतसंस्था आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले. जनरल मॅनेजर सचिन भट्टड, कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी आप्पा कोल्हे आणि कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार शाखाधिकारी आप्पा कोल्हे यांनी मानले.





