संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये भारतीय लष्कर दिन साजरा.
Celebration of Indian Army Day at Sant Dnyaneshwar English School.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 16Jan.2022 17.40Pm.
कोपरगाव : १५ जानेवारी भारतीय लष्कर दिन संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये माजी सैनिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी माजी सैनिकांच्या मुलांना पन्नास टक्के फी व शाहिदांच्या मुलांना नर्सरी ते दहावी मोफत शिक्षण देणार असल्या बाबत चे पत्र स्कूलच्या वतीने माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे यांना देण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,उपाध्यक्ष किरण भोईर,कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे,उपाध्यक्ष मारुती कोपरे व विनोद थोरात, शंकर यादव व क्रिडा शिक्षक अनुप गिरमे माजी सैनिक बाळासाहेब वाघ,मधुकर इनामके, सुभाष क्षीरसागर, पंकज झावरे, रावसाहेब मोरे, दत्तात्रय गावीत्रे, भाऊसाहेब निंबाळकर, गणेश रक्ताटे व रामनाथ वर्पे कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष किरण भोईर, शिक्षिका वैशाली लोखंडे व वसुधा झावरे यांनी लष्कर दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले. प्राचार्य सचिन मोरे यांनी माजी सैनिकांचे स्वागत केले.
या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर नाटिका सादर केली. संस्थेच्या वतीने सर्व माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वसुधा झावरे यांनी केले तर आभार मयुरी भोसले यांनी मानले.





