कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोसई भरत नागरे यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहिर
Kopargaon City Police Station Posai Bharat Nagre announced President’s Bravery Award
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 25Jan.2022 18.50Pm.
कोपरगांव :येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरिक्षक भरत चिंतामणी नागरे यांना सन २०१८ मध्ये नक्षलवादी कारवायांचा खात्मा करण्यासाठी केलेल्या शौर्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहिर झाला असून हा पुरस्कार नजिकच्या काळात राज्यपाल यांच्या हस्ते बहाल होईल. त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस वर्तुळात व कोपरगांव तालुक्यातून स्वागत होत आहे.
कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षक भरत नागरे हे सन २०१८ पासून कार्यरत आहेत तेे औट पोस्ट कोटमी या ठिकाणी प्रभारी पीएसआय असतांना त्यांच्यावर नक्षलवाद्याचा बंदोबस्त करण्याची कामगिरी आली. भरत नागरे यांना इटापल्ली तालुक्यातील मेंढरी या ठिकाणी नक्षलवादी दबा धरुन बसलेले व ते कांही घातपाती कारवाया करणार असल्याची पक्की खबर मिळाली त्या खबरीनुसार भरत नागरे यांच्या नेतृत्वाखाली ४०-४५ जणांचा पोलीस फौजफाटा मेंढरी या ठिकाणी जावून धडकला त्या ठिकाणी संपूर्ण घनदाट जंगल होते व अशा जंगलात नक्षलवाद्यांना हुडकणे हे एक धाडसाचे काम होते. पोलीस आपल्या मागावर आहेत याची कुणकुण नक्षलवाद्यांना लागताच पोलीस ताफ्याच्या मार्गावर या नक्षलवाद्यांनी स्फोटक बॉम्ब पेरुन ठेवले पैकी चार बॉम्ब नागरे यांच्या पथकाने निकामी केले. सदर बॉम्ब निकामी केल्यानंतर दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांना शरण येण्याचे अगोदर आवाहन करण्यात आले परंतु प्रतिसाद न मिळाल्याने पोलीसांनी त्यांच्या दिशेने कुच केले समोरुन पोलीसांवर गोळीबार सुरु झाल्यानंतर नागरे यांच्या पथकाने त्याला गोळीने प्रत्युत्तर दिले त्यात एक नक्षलवादी ठार झाला ही गोष्ट २५ मार्च २०१८ सालची आहे. या शौर्याची दखल केंद्र सरकारच्या गृह खात्याने घेतली व शौर्याबद्दल पोलीस उपनिरिक्षक भरत नागरे हे राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरले त्यांच्या नांवाची शिफारस झाल्यानंतर त्यांना हा पुरस्कार जाहिर झाला.
श्री भरत नागरे यांना सन २०१८ साली पोलीस खात्याचा खडतर सेवा पुरस्कार मिळाला असून सन २०१९ साली त्यांना विशेष सेवा पुरस्कार मिळाला आहे. पोलीस निरिक्षक वासुदेव देसलें सह सर्वांनी नागरे यांचे अभिनंदन केले. सदर पुरस्कार प्राप्त भरत नागरे यांचे पोलीस खात्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.