समन्यायी पाणी वाटप कायद्याला मुकसंमतीमुळे तालुका ५५ वर्षे मागे नेला – चंद्रकांत चांदगुडे

समन्यायी पाणी वाटप कायद्याला मुकसंमतीमुळे तालुका ५५ वर्षे मागे नेला – चंद्रकांत चांदगुडे

Taluka takes 55 years back to equitable water distribution law – Chandrakant Chandgude

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir11Fab2022 20.10Pm.

कोपरगाव : गोदावरी डाव्या कालव्यासाठी ५५ कोटी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची धूळफेक विद्यमान आमदारांनी केली आहे.  समन्यायी पाणी वाटप कायद्याला मुकसंमतीमुळे तालुका ५५ वर्षे मागे नेला अशा लोकांची कोल्हे कुटूंबावर टिका करण्याची पात्रता नाही अशी घणाघाती टिका भाजपाचे चंद्रकांत चांदगुडे यांनी सोमनाथ चांदगुडे यांचा नामोल्लेख टाळत केली.

जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली म्हणूनच कोल्हे कुटूंब सर्वाधिक काळ सत्तेत आहे. तर जनतेची दिशाभूल करून वागणारे काळे कुटूंब सत्तेच्या बाहेर राहिले आहे. हा पूर्वइतिहास देखील सोमनाथ चांदगुडे यांनी बघायला हवा. कालवा सल्लागार समितीच्या बैठका कोपरगावमध्ये घ्या नाहीतर मंगळग्रहावर जाऊन घ्या फक्त शेतकरी बांधवांना पाणी द्या हेच शेतकरी सांगत होते .पण फक्त कोपरगावला बैठकीचा फार्स विद्यमान आमदारांनी केला. कालवा दुरुस्तीच्या गप्पा मारल्या जात आहेत परंतु दोनच दिवसांपूर्वी कालवा फुटला आहे,असेही शेवटी चांदगुडे म्हणाले आहेत.

चौकट- समन्यायी पाणी वाटप कायद्याला मुकसंमती देऊन तालुक्याचे वाळवंट केले,यामुळे ५५ वर्षे तालुका मागे गेला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ५५ कोटी कालवे दुरुस्तीला मिळवले असे म्हणणे म्हणजे वायफळ बातम्या पेरणे असे आहे अशी टिका चंद्रकांत चांदगुडे यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page