राजकारणापायी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका – सोमनाथ चांदगुडे

राजकारणापायी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका – सोमनाथ चांदगुडे

Don’t mislead farmers by politics – Somnath Chandgude

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir11Fab2022 20.00Pm.

कोपरगाव : ना. आशुतोष काळे यांनी मंत्री जयंत पाटीलांकडुन गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटीची मंजुरी मिळविली,पैकी चालू वर्षात आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. परंतु ज्यांनी कालवे दुरुस्तीसाठी काही केले नाही त्यांचे कालवा दुरुस्तीबाबत चे वक्तव्य हास्यास्पद असल्याची टिका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ चांदगुडे यांनी विवेक कोल्हे यांच्यावर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

२००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या कार्यकाळात माजी आमदार अशोक काळे विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही त्यांनी गोदावरी कालव्यांची दुरुस्ती केली होती. याउलट चाळीस वर्षे सत्ता असतानाही त्यांना कधीच कालवे दुरुस्तीला प्राधान्य द्यावेसे वाटले नाही याची लाभधारक शेतकऱ्यांना अजूनही खंत आणि आश्चर्य वाटते. ना. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातुन ८४ कोटीच्या कालवे दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ३६ कोटीच्या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. तेंव्हा खोडसाळ राजकारणापायी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका असा सल्ला चांदगुडे यांनी पत्रकातून दिला आहे.

चौकट :- आवर्तनाचा काळ वगळून कालवे दुरुस्ती करावी लागणार आहे हे लाभधारक शेतकरी जाणून आहेत. मात्र ज्यांनी सल्लागार समितीची बैठक लाभ क्षेत्रातून मुंबईला नेली कळवळा हे तर पुतना मावशीचं प्रेम आहे. – सोमनाथ चांदगुडे

Leave a Reply

You cannot copy content of this page