विसपुते सराफ बस्ता फेस्टिव्हल: १ लाखाच्या महापैठणीचे बक्षिस वितरण सोमवारी

विसपुते सराफ बस्ता फेस्टिव्हल : १ लाखाच्या महापैठणीचे बक्षिस वितरण सोमवारी

Vispute Saraf Basta Festival: Prize distribution of 1 lakh Mahapaithani on Monday

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat12 Fab2022 17:30Pm.

कोपरगाव : येथील प्रसिध्द विसपुते सराफी पेढीच्या विवाह अलंकार – बस्ता फेस्टिव्हल या योजनेत दिल्या जाणाऱ्या रु. १ लाख किमतीच्या दुसऱ्या महापैठणीचे बक्षिस वितरण १४ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली.

खास यंदाच्या लग्नसराईसाठी विसपुते सराफी पेढीने २५ डिसेंबरपासून जाहीर केलेल्या या विवाह अलंकार बस्ता फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.रु.१००००/- च्या सोन्याच्या दागिने खरेदीवर ग्राहकांना प्रत्यकी एक कुपन मोफत दिले जात आहे. येत्या १५ मार्चपर्यंत चालणाऱ्या या योजनेत दरमहा रु.१ लाख किमतीची एक प्युअर येवला पैठणी याप्रमाणे तीन महापैठण्या भाग्यवान ग्राहकांना सप्रेम भेट देण्यात येणार आहेत.त्यातील रु.१ लाख किमतीच्या पहिल्या पैठणीच्या वर्षा सदाफळ या मानकरी ठरल्या.

या योजनेतील दुसऱ्या महापैठणीचे बक्षिस वितरण येत्या सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वा. संपन्न होणार आहे. दिवाळीनंतर मोठी लग्नसराई असते त्यामुळे या काळात होणाऱ्या बस्त्यांची संख्याही लक्षणीय असते.त्यासाठी व्हरायटी आणि ग्राहकांना उत्तम सेवा सुविधा मिळाव्यात याला प्राधान्य देणाऱ्या विसपुते सराफी पेढीच्या या योजनेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय २२ कॅरेटचे हॉलमार्क दागिने बदलून घेताना वजनात घट आकारली जात नसल्याने ग्राहकांचा दुहेरी फायदा या योजनेमुळे झाला आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न हा त्या आईसाठी सर्वात महत्वाचा दिवस असतो , विसपुते सराफी पेढीच्या महापैठणी या अनोख्या बक्षिसामुळे सर्वसामान्य गृहिणीचा आंनद शतगुणीत होणार आहे. आवडत्या दागिन्यांबरोबरच पैठणीचे स्वप्न पुर्ण करण्याची संधी या योजनेमुळे मिळाल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.या विवाह अलंकार बस्ता फेस्टिव्हल योजनेतील दुसऱ्या महापैठणीचे बक्षिस वितरण  १४ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वा. विसपुते सराफ संभाजी चौक येथे संपन्न होणार आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळून होणाऱ्या या कार्यक्रमाला ग्राहकांनी उपस्थित रहावे आणि येताना आपले कुपन सोबत आणावेत असे आवाहन पेढीचे युवा संचालक यश विसपुते आणि प्रेम विसपुते यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page