जेउरकुंभारीच्या १० कोटीच्या नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी- सुवर्णा पवार
Administrative approval for 10 crore tap water supply scheme of Jeurkumbhari – Suvarna Pawar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Fab2022 16:00Pm.
कोपरगांव : भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मौजे जेउरकुंभारीच्या ९ कोटी ९२ लाख ३१ हजार रूपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळाली असुन कक्ष अधिकारी डॉ रविंद्र भराटे यांनी त्याबाबतचा शासननिर्णय १६ फेब्रुवारी रोजी काढला असल्याची माहिती सरपंच सुवर्णा सतिष पवार व उपसरपंच जालिंदर रावसाहेब चव्हाण यांनी दिली.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मौजे जेउरकुंभारी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची किंमत ५ कोटी रूपयापेक्षा जास्त असल्याने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांनी सदरचा प्रस्ताव शासन मंजुरीसाठी पाठविला होता, त्याबाबत तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व संबंधीत कार्यान्वयीन योजनेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संचालक स्व. सुभाषराव आव्हाड यांची या योजनेसाठी मोठी तळमळ होती.
कोपरगांव पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव वक्ते, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते, माजी उपसरपंच यशवंत विठठल आव्हाड, माजी संचालक मधुकरराव वक्ते, रमेश वक्ते यांच्यासह विविध आजी माजी पदाधिका-यांनी या योजना कामातील त्रुटींची पुर्तता करून त्यास मंजुरी मिळावी म्हणून आग्रह धरला होता. त्यामुळे या योजनेस जल जीवन मिशन अंतर्गत १६ फेब्रुवारी २०२२ रोजी शासन निर्णय ग्रामिण पाणी पुरवठा योजना १९६ नुसार ९ कोटी ९२ लाख ३१ हजार रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ग्रामपंचातीचे सर्व सदस्य व जेउरकुंभारी गावातील प्रतिष्ठीतांनी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले आहे.