पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत
Environment Minister Aditya Thackeray welcomed at Shirdi Airport
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Fab2022 16:50Pm.
कोपरगाव : महाराष्ट्राचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचे शुक्रवारी दुपारी दीड वाजता शिर्डी विमानतळावर आगमन झाले. येथून ते सोनईला गेले. श्री साई संस्थान अध्यक्ष आमदार आशुतोष आशुतोष काळे, यांनी साई देवस्थान कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
यावेळी जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, श्री साई संस्थान विश्वस्त सचिन गुजर, राहुल कनाल, महेंद्र शेळके, जयंत जाधव, डॉ एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, अनुराधा आदीक, अविनाश दंडवते, ॲड. सुहास आहेर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. भाग्यश्री बानायत, उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, निलेश कोते,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, हे उपस्थित होते .
यावेळी ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील विविध प्रश्नावर चर्चा केली व श्री साई संस्थानसाठी इलेक्ट्रिक बसेस मिळाव्या अशी मागणी केली.