कालव्यातून येणारे पाणी शुद्धच, विरोधकांनी वावड्या उठवू नये – बोरावके

कालव्यातून येणारे पाणी शुद्धच, विरोधकांनी वावड्या उठवू नये – बोरावके

The water coming from the canal is pure

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu16 Fab2022 21:00Pm.

कोपरगाव: हरित लवादाने गोदावरी नदीच्या पाण्याबाबत अहवाल दिला आहे कालव्याच्या पाण्याबाबत नाही. कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी वावड्या उठवू नये असा सल्ला राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांनी विरोधकांना दिला आहे.

ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२३ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. तसेच ३.३६ एमएलडी वाढीव पाणी आरक्षित करून घेतले आहे. हि भीती विरोधकांना असल्याचे बोरावके यांनी म्हटले आहे.

पाण्याच्या प्रश्नाबाबत काळे परिवार किती संवेदनशील आहे हे कोपरगाव शहर व तालुक्यातील जनता जाणून आहे. मात्र ज्यांना वर्षानुवर्षांपासून पाण्यावर राजकारण करायचे आहे त्यांना येणारी कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर दिसत आहे. कोपरगाव शहराच्या नागरिकांना आजवर येणारे पाणी कालव्यातूनच येत होते व यापुढेही कालव्यातूनच येणार आहे गोदावरी नदीतून येणार नाही. त्यामुळे उगाचच संभ्रम निर्माण करू नये.

१२३कोटी मिळणार असून त्यातून ५ नंबर साठवण तलावासह लक्ष्मीनगर, ब्रिजलाल नगर, बेट मोहनीराज नगर, संजयनगर याठिकाणी पाण्याच्या टाक्या देखील बांधण्यात येणार आहे. तेंव्हा उगाच वावड्या उठवून जनतेत संभ्रम पसरवू नये असे बोरावके यांनी विरोधकांना म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page