अटल टिंकरिंग लॅबमुळे नाविन्यपूर्ण अविष्कारातून उद्याचे शास्त्रज्ञ घडतील – समीरभाई सोमय्या

अटल टिंकरिंग लॅबमुळे नाविन्यपूर्ण अविष्कारातून उद्याचे शास्त्रज्ञ घडतील – समीरभाई सोमय्या

Atal Tinkering Lab will lead to tomorrow’s scientists through innovative inventions – Sameerbhai Somaiya

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon21 Fab2022 16:50Pm.

कोपरगाव : अटल टिंकरिंग या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाल्यामुळे ते नाविन्यपूर्ण अविष्कार तयार करू शकतात व यातूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडतील”. असे गौरवोद्गार सोमय्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा समीरभाई सोमय्या यांनी गुरुवारी सोमय्या विद्यामंदिर साकरवाडी येथे केंद्र सरकार व निती आयोग पुरस्कृत अटल टिंकरिंग प्रयोगशाळेचे शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी सोमैया उद्योग समूहाचे अध्यक्ष समीरभाई सोमैया, कुणाल शर्मा , समीर पाटोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल, सर्जनशीलता वाढवून त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे व त्यासाठी अनुकूल कौशल्ये व मानसिकता विकसित करणे या उद्देशाने केंद्र सरकार अटल इनोव्हेशन मिशन भारतभरातील शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज (ATLs) स्थापन करत आहे. यामध्ये विविध विद्युत व संगणकीय उपकरणे यांचा समावेश यात आहेत.

या कार्यक्रमाला गोदावरी बायोरिफायनरीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय सुहास गोडगे , बी. एम. पालवे , बी. पी. पाटील , श्री. सौदागर , संजय कराळे ,गणेश पाटील , शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता पारे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीम. शीतल नागरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विज्ञान विभागाचे इसाक शेख, संजय राऊत, श्रीम. सविता सोमवंशी, श्री. वाल्मीक माळवदे, श्री. अक्षय घनघाव, श्री. सत्यजित जगताप तसेच श्री. सागर भगत, श्री. योगीराज चव्हाण, श्रीम. सीमा धोंडे, श्री. संजय चौगुले व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page