अधिकाऱ्यांनो, आजचे प्रश्न पुढच्या जनता दरबारात येता कामा नये – ना.आशुतोष काळे
Officers, today’s issues should not come up in the next Janata Darbar – Na. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon21 Fab2022 17:30Pm.
कोपरगाव: नागरिकांचे सर्व शासकीय कार्यालयातील प्रश्न व अडी अडचणी तात्काळ मार्गी लागणेसाठीच जनता दरबार आहे. इथे नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरुपात सबंधित विभागाकडे दिल्या जातात. तेव्हा आजचे प्रश्न पुढच्या जनता दरबारात येता कामा नाही त्या पुढच्या दरबारात खुलासा आणि जाब द्यावा लागणार आहे हे लक्षात ठेवा अशा स्पष्ट सूचना श्री साई संस्थान अध्यक्ष ना. अशुतोष काळे यांनी सोमवारी (२१) रोजी तहसील कार्यालय सभागृहात झालेल्या जनता दरबारात उपस्थित सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

रेंगाळलेले प्रश्न, चकरा मारून थकलेले नागरिक यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी नामदार काळे यांनी यांनी जनता दरबार सुरु केले. जनता दरबाराच्या माध्यमातून सबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी जागेवरच कानपिचक्या दिल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे दर दोन ते तीन महिन्यांनी कोरोना काळात जनता दरबार बंद होते. तरीदेखील प्रत्यक्ष भेटीतून ना. आशुतोष काळेंचे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सुरूच होते. या समस्या सोडविण्याला गती देण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा जनता दरबाराच्या माध्यमातून पुन:श्च हरिओम केला आहे.
यावेळी नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरूपात घेवून सबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत तातडीने निर्णय घेवून कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या नागरिकांच्या अडचणी व प्रश्न जास्तीत जास्त स्वरूपात कसे मार्गी लागतील यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
सोमवारी झालेल्या या जनता दरबारात ना आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार विजय बोरुडे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रशांत वाकचौरे, डावा कालवा उपअभियंता थोरात, उजवा कालवा उपअभियंता महेश गायकवाड, प्र.तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,कोपरगाव नगरपरिषदेचे ज्ञानेश्वर चाकणे, महावितरण अभियंता भूषण आचार्य, सहा. अभियंता अतुल खंदारे, यज्ञेश शेलार, डी.डी.पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक यशवंत ठोंबरे, चारी ड्रेनेज उपअभियंता शिंदे, वनविभाग श्रीम.प्रतिभा पाटील, सामाजिक वनीकरण उपअभियंता श्रीम.पूजा रक्ताटे, मेडिकल ऑफिसर डॉ.कृष्णा फुलसौंदर, आदी खात्याचे अधिकारी,
सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, सुधाकर रोहोम, कारभारी आगवण, माधवराव खिलारी, सुनील गंगुले, नवाज कुरेशी,, मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, मधुकर टेके, श्रावण आसने, कलविंदरसिंग डडीयाल, सुनील साळुंके, फकीर कुरेशी, आकाश डागा, राजेंद्रे जोशी, चंद्रशेखर म्हस्के, प्रदीप कुऱ्हाडे, संजय काळे, राजेंद्र खिलारी, सागर लकारे. किरण बागुल, नंदकिशोर औताडे,नारायण लांडगे, इम्तीयाज अत्तार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





