मविआ सरकारने जलदरवाढ करू नये त्याला आमचा विरोध-सौ.स्नेहलता कोल्हे

मविआ सरकारने जलदरवाढ करू नये त्याला आमचा विरोध-सौ.स्नेहलता कोल्हे

Our opposition to the Mavia government should not increase water rates – Mrs. Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon21 Fab2022 16:40Pm.

कोपरगांव : उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे, त्यात शंभर वर्षांचे जुने कालवे, दुरुस्तीसाठी पुरेसा निधी नाही यामुळे सिंचन पाटपाण्याची व्यवस्था धोक्यात आली आहे त्यात दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे तेव्हा घरगुती, औद्योगिक आणि कृषी सिंचन जलदरवाढ महाविकास आघाडी शासन जलसंपदा विभागाने करू नये यास आमचा विरोध असल्याच्या प्रतिक्रिया माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केले आहेत .

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर पाणीपटटी दरवाढीचा मसुदा टाकण्यात येवून त्यावर आजी माजी आमदारांच्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत. त्यावर सौ स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या .

सौ कोल्हे म्हणाल्या, निसर्गाचा लहरीपणा सुरू आहे, कोरोनामुळे शेतकरी व जनता हतबल झाली आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडी शासनाने २०२०-२३ साठी पाणीपटटी वाढीचा निर्णय घेतला असुन सुधारीत ठोक जलदर निश्चित केले असुन त्याची अंमलबजावणी १ जुलै २०२० पासून होणार असल्याचे समजते. असे त्यांनी जलसंपदा मंत्री यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. ही दरवाढ शेतक-यांच्या नागरिक व व्यावसायिक या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत जाचक आहे.जलदर शेतक-यांसह पाणीवापरकर्त्यांना न परवडणारे आहेत तर दुसरीकडे वीजबिलाची पठाणी वसुली तेंव्हा जास्तीत जास्त पाणीवापर संस्था, पाणी वापरकर्ते, जलक्षेत्रातील विविध तज्ञ, शेतकरी, शासकीय संस्था, अन्य उपभोक्त्यांनी या पाणीपटटी दरवाढीस कडाडुन विरोध करावा. असे आवाहन सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page