सहकार महर्षी कोल्हे कारखाना सुरक्षा आपत्ती व्यवस्थापनात अव्वल- दवंगे.

सहकार महर्षी कोल्हे कारखाना सुरक्षा आपत्ती व्यवस्थापनात अव्वल- दवंगे.

Sahakar Maharshi Kolhe Factory Safety Top in Disaster Management.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tur 8 Mar 2022 17:40Pm.

कोपरगाव : सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कामगारांच्या सुरक्षीततेला सर्वोच्च प्राधान्य देवुन आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी कोल्हे कारखाना अहमदनगर जिल्हयात अव्वल असल्याचे प्रतिपादन उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी मंगळवारी ५१ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहात केले .

यावेळी दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी उपस्थित कामगारांना सुरक्षा शपथ देत म्हणाले की, आपले आयूष्य अनमोल आहे, तेव्हा सुरक्षा सप्ताह आयूषभर साजरे व्हावेत. आयूष्य ही शिकवण देणारी प्रक्रिया असून कुटूंबाबरोबरच स्वतःच्या व संस्थेच्या सुरक्षीततेला सर्वांनी महत्व द्यावे. सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी प्रास्तविक केले.

ॲडमिनिस्ट्रेटिव मॅनेजर प्रकाश डुंबरे, पी. एस. अरगडे यांनी आग लागल्यावर कोणती खबरदारी घ्यायची व ती आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजनासह कारखान्यातील रासायनीक सुरक्षा उपकरणांची माहिती दिली. वर्षभरात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांत सुरक्षा विषयक काळजी घेणा-या कामगारांना प्रमाणपत्र व भेट वस्तुंचे संचालक सोपानराव पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, फकिरराव बोरनारे, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव, कामगार नेते मनोहर शिंदे. वेणूनाथ बोळीज, कोपरगांव तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, मुख्य रसायन तज्ञ विवेककुमार शुक्ला, मुख्य अभियंता के शाक्य, आदि खातेप्रमुख, उपखातेप्रमुखांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, प्रविण गिरमे, डॉ. मनोज बत्रा, उस विकास अधिकारी, शिवाजीराव देवकर, केमिकल विभागाचे तात्यासाहेब देवकर, कंट्रीलिकरचे बी. एन. पदाडे, मुख्य लेखापाल एस. सन. पवार यांच्यासह पदाधिकारी, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

शेवटी सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page