महिलादिनी बाळासाहेब ठाकरे कॉलेजात महिला कक्षाची स्थापना
Women’s Day Establishment of Women’s Room in Balasaheb Thackeray College
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tur 8 Mar 2022 17:30Pm.
कोपरगाव :- हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (८) रोजी महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला कक्षाची स्थापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा.शितल काळे होत्या.
यावेळी प्राचार्य शांतीलाल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक शीतल काळे म्हणाले यंत्र नार्यस्तु,रमन्ते तंत्र देवताः! यानुसार पूर्वापार स्रियांना भारतीय संस्कृतीत मनाचे स्थान दिले गेलेले आहे.पण ते केवळ या श्लोका पुरतेच मर्यादित न ठेवता समाजाने त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे, स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ज्ञानाच्या आणि स्वतःच्या कर्तृत्वावर स्रियांनी देशाच्या राष्ट्रपती पदापासून ते वकील, डॉक्टर, इंजिनिअर, गायक, अंतराळविर, शास्रज्ञ, पोलिस,खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. असे प्रा.निकिता सांगळे म्हणाल्या,.
विद्यार्थिनी औताडे मंजुषा, प्रांजली खंडीझोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.शितल औताडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.भावना गांधीले यांनी केले.व आभार प्रा.जयश्री जाधव यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.