अर्थसंकल्पात कोपरगाव  ग्रामीणच्या त्या रस्त्यांसाठी २० कोटीची तरतुद – ना.काळे

अर्थसंकल्पात कोपरगाव  ग्रामीणच्या त्या रस्त्यांसाठी २० कोटीची तरतुद – ना.काळे

In the budget, provision of Rs. 20 crore for those rural roads of Kopargaon – Na.Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fit 11 Mar 2022 18:,21Pm.

कोपरगाव : मतदारसंघातील झगडे फाटा-तळेगाव-वडगाव पान (राज्य मार्ग ६५) व सावळीविहीर-चास -भरवस-लासलगाव (राज्य मार्ग ७) या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात २० कोटीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी एका  प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत माहिती देताना नामदार काळे म्हणाले,मतदार संघातील रस्ते विकासाचा मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून या रस्त्यांना निधी मिळावा यासाठी २०२० पासून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख तालुका हद्द व राज्यमार्ग ७ वरील शहाजापूर ते सात मोऱ्या तालुका हद्द या रस्त्यासाठी २० कोटीची २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आली आहे. हे प्रमुख राज्यमार्ग खराब झाल्यामुळे  व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर होवून त्यांचे व्यवसाय थंडावले होते. तसेच शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना देखील त्याचा मोठा त्रास होत होता. असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे

ना. आशुतोष काळे  यांनी रस्त्यांसाठी २० कोटीची २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात तरतूद केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page