प्रेरणा फाऊंडेशन चे कार्य कौतुकास्पद- ना.काळे
The work of Prerna Foundation is commendable-Na.Kale
कोपरगाव : येथे प्रेरणा फाउंडेशन च्या वतीने शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक , धार्मिक आदी क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार सन्मान सोहळा ना.आशुतोष काळे. व शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले. यांचे प्रमुख उपस्थतीत आयोजित करण्यात आला होता.
कोपरगाव येथील प्रेरणा फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद आहे. महिला दिनाचे औचित्य साधून आज रोजी जो महिलांचा सत्कार केला त्यातून निश्चितच महिलांना त्यांच्या क्षेत्रात अधिकाधिक काम करण्याची ऊर्जा मिळेल व त्यांची निश्चितच प्रगती होईल अशा प्रकारची प्रेरणा प्रेरणा फाउंडेशन ने दिलेले आहे असे प्रतिपादन ना. आशुतोष काळे यांनी केले.
उपस्थित सत्करार्थी महिलांना ट्रॉफी सन्मानचिन्ह म्हणून देण्यात आले . सदर कार्यक्रमात ॲड श्रद्धा जवाद ,स्वाती मुळे ,सौ वर्षा झवर, डॉ.सौ उमा भोईर ,सौ. निता शिंदे ,प्रमुख पाहुणे वासुदेव देसले. आदींची भाषणे झाली .
या प्रसंगी प्रेरणा फाऊंडेशन चे अध्यक्ष ॲड. मनोज कडू, निलेश शेठ जोबंनपुत्रा, संदीप कानकुब्जी ॲड ,बाळासाहेब कडू, .दौलत शिरसाठ, .दिलीप भालेराव, मुस्तफा शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड रश्मी कडू यांनी तर प्रास्ताविक ॲड. सौ. पुष्पलता कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ . वैशाली उल्हारे यांनी केले.