चिठ्ठीचा कौल: बक्तरपूरच्या उपसरपंच काळे गटाच्या राधाबाई नागरे

चिठ्ठीचा कौल: बक्तरपूरच्या उपसरपंच काळे गटाच्या राधाबाई नागरे

Letter to Kaul: Radhabai Nagre of Baktarpur upsarapanch kale group

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 17 Mar 2022 17:00Pm.

कोपरगाव: बक्तरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत चिठ्ठीचा कौल मिळाल्याने काळे गटाच्या सौ.राधाबाई धर्मराज नागरे या उपसरपंच झाल्या.

बक्तरपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच शिवाजी सानप यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत काळे गटाकडून सौ.राधाबाई नागरे यांनी उपसरपंच पदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. तर विरोधी गटाकडून सौ. सरला सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पार पडलेल्या निवडणुकीत राधाबाई नागरे यांना ३मते व विरोधी गटाच्या सौ. सरला सानप यांना ३ मते अशी समसमान मते पडली होती. त्यावेळी दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून निवड करण्यात आली. यामध्ये काळे गटाच्या राधाबाई नागरे यांच्या नावाची चिट्ठी निघाल्यामुळे त्यांना निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी एफ.एम.तडवी यांनी उपसरपंच घोषित केले .

यावेळी उपसरपंच सौ.राधाबाई धर्मराज नागरे, सदस्य गणेश सानप, विशाल सानप, सौ.ताईबाई पवार, अशोक सानप, सोमनाथ सानप आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच सौ.राधाबाई नागरे यांचे मा.आ.अशोक काळे व ना.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page