स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या रक्षा व अस्थींचे हिंगणी बंधाऱ्यात विसर्जन
Raksha of late Shankarrao Kolhe and immersion of bones in Hingani dam
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 17 Mar 2022 18:10Pm.
कोपरगांव: काल (दि. १६ मार्च) माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे निधन झाले. संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या मैदानावर सपुर्ण शासकिय इतमामात त्यांचेवर अंत्यसंस्कार हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आज सकाळी त्यांची रक्षा व अस्थी गोळा करण्यात आली व गोदावरी नदीवर त्यांनीच बांधलेल्या हिंगणी बंधाऱ्यात अस्थी व रक्षेचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी कै. कोल्हे यांच्या परीवारातील सर्वच उपस्थित होते. तसेच संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी आणि इंतरही कोल्हे कुटुंवियांवर प्रेम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कै. कोल्हे यांनी शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अनेक लढे दिले. भुगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी तालुक्यातील ओढे नाले यांच्यावर छोटे छोटे साखळी बंधारे बांधुन जलसंवर्धानाचे कार्य केले. याच अनुषंगाने त्यांनी तालुक्यातील हिंगणी येथे गोदावरी नदीवर सन १९८८ मध्ये रू ६६ लाख खर्चुन बंधारा बांधला. यामुळे सुमारे ७५० हेक्टर ओलीताखाली आले. पाणी हा त्यांचा सर्वात जिव्हाळ्यााचा विषय होता. म्हणुनच कै. कोल्हे यांच्या कुटूंवियांनी त्यांच्या अस्ती व रक्षा विसर्जन हिंगणी बंधाऱ्यात करण्याचा निर्णय घेतला.
१९८०-९० च्या दषकात एखाद्याा शेतकऱ्याने ३०० फुट खोल जरी खोल बोअरवेल घेतले तरी त्या बोअरवेलच्या मधुन पाणी येण्याऐवजी शेतकर्यांच्याच डोळ्यातून पाणी येत असे. परंतु कै. कोल्हे यांच्याच संकल्पनेतुन पुढे गोदावरी नदीवर पुणतांबा ते कानळद या सुमारे ७२ किमीच्या पट्यात ६-७ ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. यामुळे या पट्यात गोदावरीच्या डाव्या व उजव्या बाजुच्या सुमारे ३ ते ४ किमीच्या अंतरावर आज भुगर्भातील पाणी वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
Post Views:
460