धारणगाव रस्ता थांबला ; राष्ट्रवादीचा मुख्याधिकार्‍यांना घेराव

धारणगाव रस्ता थांबला ; राष्ट्रवादीचा मुख्याधिकार्‍यांना घेराव

Dharangaon road stopped; NCP’s siege on the Chief Officer

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Mon 21 Mar 2022 18:30Pm.

कोपरगाव :कोपरगाव शहरातील डॉक्टर आंबेडकर पुतळा ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा धारणगाव रोड त्या धारणगाव रोडचे काम संथ गतीने चालू असून रस्ता जणू थांबला आहे यामुळे सोमवारी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घातला व कामाबाबत जाब विचारला. व आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.

आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला चालना देताना शहराच्या रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी वेगळ्या मार्गाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र काही रस्त्यांची कामे तातडीने झाले परंतु धारणगाव रस्त्याचे काम गेल्या महिन्यापासून संथगतीने सुरू आहे त्यामुळे येथील व्यापारी धूळ धुळीमुळे हैराण झाले असून व्यापार ठप्प झाला आहे. अनेकदा या व्यापा-यांनी काम तातडीने करण्यासंबंधी पालिकेकडे पाठपुरावा केला, मागण्या केल्या, परंतु तरीही काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत असून हि थांबलेली विकासकामे त्वरित सुरु करावी.यासाठी सोमवारी (२१मार्च) रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट नगरपालिकेचे जाऊन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या दालनात प्रवेश करून त्यांना घेराव घातला व या कामासंबंधी जाब विचारला, व विकासकामे थांबविणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा निवेदनातुन दिला.

आ. आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव शहरात श्री छत्रपती संभाजी सर्कल ते गोकुळ नगरी रस्ता, बाजारतळ स्मशानभूमी, मोहनीराज नगर, धारणगाव रोड, श्री छत्रपती संभाजी सर्कल ते आचारी हॉस्पिटल, श्री छत्रपती संभाजी सर्कल ते नागरे पेट्रोल पंप, नगरपालिका प्रशासकीय इमारत समोरील गार्डन, तसेच प्रत्येक प्रभागात सुरु असलेल्या छोट्या मोठ्या रस्त्यांची विकासकामे सुरु झाली. मात्र महिन्यापासून हि विकासकामे थांबली आहेत तर काही विकासकामे अतिशय संथ गतीने सुरु असल्यामुळे शहरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या आत सर्व विकासकामे पूर्ण व्हावीत अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र या विकासकामात राजकारण तर आडवे येत नाही ना? असा सवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

कोपरगाव नगरपरिषदेवर मुदतीच्या आत पूर्ण करून घेणे हि जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दाखल घेवून व आपली जबाबदारी ओळखून कोपरगाव नगरपरीषद प्रशासनाने थांबलेली विकासकामे तातडीने सुरु करावीत. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, जावेद शेख, राहुल देवळालीकर, इम्तियाज अत्तार, राजेंद्र खैरनार, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, संदीप कपिले, राजेंद्र आभाळे, संतोष शेलार, प्रसाद उदावंत, रविंद्र राऊत, प्रमोद कुऱ्हाडे, सुनील बोरा, योगेश वाणी, किरण बागुल, मनोज नरोडे, मुकुंद इंगळे, महेश उदावंत, गणेश बोरुडे, शिवाजी कुऱ्हाडे, राहुल राठोड, शैलेश साबळे, गणेश लकारे, योगेश नरोडे, विकास बेंद्रे, रोहित खंडागळे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page