नं. तलावासाठी १३१ .२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी –ना. आशुतोष काळे

५ नं. तलावासाठी १३१ .२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी –ना. आशुतोष काळे

No. Administrative sanction of Rs. 131.24 crore for the lake. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sat 26 Mar 2022 15 :20Pm.

कोपरगाव : कोपरगाव शहराच्या
५ नं.  तलावासाठी १३१ .२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी महाविकास आघाडी सरकारकडून मिळाली असल्याची माहिती ना.आशुतोष काळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

संधी द्या, तुमचा पाणीप्रश्न सोडवून दाखवितो असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साक्षीने ना. आशुतोष काळे यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत संगीतले होते. त्यावर विश्वास ठेवून सुज्ञ मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठविले. ५ नंबर साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शरद पवार यांची देखील अनमोल मदत झाल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

काही वर्षापासून कोपरगावच्या नागरिकांना पाणी प्रश्न भेडसावत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासुनचा कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात ना. आशुतोष काळे यांना यश आले आहे. त्याबद्ल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितद
पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, नगरविकास राज्य मंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे कोपरगाव शहरातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page