कोपरगाव : नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुढच्या आठवड्यात निश्चित
Kopargaon: Municipal encroachment removal campaign is scheduled for next week
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Fir 3 June, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : नगरपालिकेने शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे मोहिमेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. आता सोपस्कर पूर्ण झाले असून, शहरात पुढील आठवड्यापासून अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी दिली. नगर पथ विक्रेता समिती बैठकीत त्याबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
शहरात मुख्य रस्ता धारणगाव रोड, इंदिरा गांधी नगर रोड, बस स्थानक परिसर, श्री. गो. विद्यालय रोड वाहतुकीच्या ठिकाणी जवळपास तीनशे च्या वर विविध अतिक्रमणे झाली आहेत त्याबाबत तसा सर्वे झाला असून आत्तापर्यंत १६५ जणांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आले आहेत. असे नगर रचना सहाय्यक नितेश मिरीकर यांनी सांगितले.
कोपरगाव नगर पथविक्रेता समिती बैठक शहर पोलीस ठाण्यात सभागृहात संपन्न झाली. सदर बैठकी मध्ये शहरामधील पथविक्रत्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता, मर्यादित कौशल्य व आर्थिक पत यामुळे व्यवसायाच्या संधी कमी उपलब्ध असतात. यामुळे असंघटीत आणि स्वयंरोजगार करणाऱ्या पथविक्रेत्यांना व्यवसायाच्या व्यापक संधी उपलब्ध करुन देणे, त्यांना कार्यकुशल बनविणे, त्यांना पत मिळविण्यास समर्थ बनविणे तसेच त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची सामाजिक सुरक्षितता, सामाजिक कल्याण व शासकीय योजनांशी सांगड घालणे त्याचे जीवनमान उंचावणे हे फेरीवाला धोरणाचे उद्दिष्ट आहे. पथविक्रेत्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी व त्यांच्या विक्रीचे विनियोजन करण्यासाठी शहरामधील विविध शासकीय कार्यालये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, विकास प्राधिकरण, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर रचना कर्यालय, पोलिस विभाग, जमीन व महसूल विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय समन्वयाने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार नगर पथ विक्रेता समिती गठीत करणे बाबत सूचित करण्यात आले होते. या अनुषंगाने नगरपरिषद हद्दीतील पथ विक्रेत्यांच्याचित पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण लवकर केले जाईल असे सांगितले.
यावेळी बैठकीस उपस्थित पथ विक्रेते प्रतिनिधी यांनी आपल्या अडीअडचणी मांडून विक्री प्रक्षेत्र ठरविणे कामी पर्याय सुचवले. त्याच प्रमाणे आम्हाला विक्री प्रक्षेत्र ठरून दिल्यास आम्ही तेथील स्वच्छता राखू, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करू.
सर्वेक्षण पूर्ण झाले नंतर पथ विक्रेता यादी प्रसिध्द करण्यात येईल. या यादीच्या आधारे पथ विक्रेता प्रतिनिधींची स्थायी नगर पथविक्रेता समिती मतदानाच्या माध्यमातून तयार करण्यात येईल. तसेच नोंदणीकृत पथ विक्रेतांना विक्री प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल.
यावेळी नगर पथ विक्रेता समिती अध्यक्ष मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी मार्गदर्शन केले.
सेन्ट्रल बँकचे गोविंद भरोसे यांनी पथ विक्रेते यांना बँक नेहमीच सहकार्य करून पतपुरवठा उपलब्ध करून देईल. विधिज्ञ
विद्यासागर शिंदे- यांनी पथ विक्रेते यांनी आपली सकारात्मक मानसिकता ठेवून शहर विकासासाठी समितीला सहकार्य करावे. पथ विक्रेते यांनी आपण ज्याभागात व्यवसाय करतो येथे आपल्यामुळे अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी.
राम थोरे- यांनी मुख्याधिकारी गोसावी यांचे आपण शेवटच्या घटका पर्यंत जावून पथ विक्रेत्यांच्या समस्या जाणून उपाययोजना करणे कामी पुढाकार घेतला याबद्दल अभिनंदन केले.समितीला आपल्या सर्व पथ विक्रेत्यांची साथ हवी तरच आपण आपली शाश्वत उपजीविकेसाठी उपाय योजना आखू शकू.
या बैठकीस नगर पथ विक्रेता समिती अध्यक्ष मुख्याधिकारी गोसावी, सदस्य शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,सहा. नगररचनाकार दीपक बडगुजर, नितेश मिरीकर, यांच्या सह शहरातील पथ विक्रेते प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीसाठी नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाचे शहर अभियानव्यवस्थापक महारुद्र गालट, रामनाथ जाधव, स्वच्छता व आरोग्य विभागचे सुनील आरण, राजेंद्र तुजारे, कवलजीत लोट, प्रवीण पोटे यांनी परिश्रम घेतले. बैठकीस अधिकारी व पथ्य विक्रेते मिळून ५१ जणांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामनाथ जाधव यांनी मानले.





