कर्मवीर काळे कारखाना २१३ दिवसांचा गळीत हंगाम; ८ लाख टनाचे गाळप, पावणे नऊ लाख साखर पोत्यांचे उत्पादन

कर्मवीर काळे कारखाना २१३ दिवसांचा गळीत हंगाम; ८ लाख टनाचे गाळप, पावणे नऊ लाख साखर पोत्यांचे उत्पादन

Karmaveer Kale Factory 213 days crushing season; Production of 8 lakh tonnes of flour, 9 lakh bags of sugar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 31 May 2022, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ सालच्या ६७ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ मंगळवारी ३१मे रोजी दु.४ वाजता कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे यांचे प्रमुख उपस्थितीत व चेअरमन ना. आशुतोष काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला .

तत्पूर्वी दु.३ वाजता कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. राजनंदा आहेर या उभयतांचे शुभहस्ते श्री.सत्यनारायण महापुजेचे आयोजन केले. यावर्षी कारखान्यांना शेतकऱ्यांना २०३ कोटी रुपये दिले.कारखान्याचे चेअरमन नामदार आशुतोष काळे व संचालक मंडळाच्या कुशल नियोजनामुळे यावर्षी चांगले गळीत झाले.तसेच या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेकदार, सिझन कंत्राटी ठेकेदार, माल पुरवठा करणारे व्यापारी, साखर खरेदी करणारे व्यापारी, पत्रकार,कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केल्यामुळे ऊस गळीत हंगाम यशस्वी करुन शकलो असे कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी प्रास्ताविकात दिली.

यावेळी बोलताना नामदार आशुतोष काळे म्हणाले, चालू गळीत हंगामामध्ये आजअखेर कारखान्याने २१३ दिवसांमध्ये एकूण ७ लाख ९७ हजार ६९७ लाख मे.टन गाळप करुन ८ लाख ७७ हजार ५०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. तसेच सरासरी साखर उतारा ११ टक्के असा मिळाला असुन आपला साखर कारखाना नगर जिल्ह्यामध्ये साखर उता-यामध्ये चांगला राहिला आहे. वर्षानुवर्ष कार्य क्षेत्राबाहेरील ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस न घेण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. कार्यक्षेत्रातील सभासद, बिगरसभासदांचा संपुर्ण ऊस गाळप करुनच सांगता समारंभाचे आयोजन केले आहे.

ना. आशुतोष काळे म्हणाले,जागतिक स्तरावर तुटवडा निर्माण होईल असा अंदाज होता मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे तेलाचे भाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखरेच्या किंमती वाढल्या त्यामुळे निर्यातीची संधी मिळाली आहे. त्या संधीचे केले. देशांतर्गत ८५ लाख मेट्रिक टन साठा आवश्यक होतं.९० लाख टन निर्यात करार झाला आहे. मागील वर्षी प्रमाणे या वेळेस केंद्राला निर्यातीसाठी अनुदान देण्याची गरज पडली नाही कारखान्यांनी स्वयंस्फूर्तीने निर्याती केल्या फायदा झाला.देशाला मोठे परकीय चलन मिळून दिले. १०० लाख मेट्रिक टन निर्यातीचे बंधन घालण्यात आले आहे . ७० लाख टन साखर उपलब्ध ठेवावी लागणार आहे.कच्ची साखर बनवायची सोय केली.आपणही दोन लाख ७९ हजार मेट्रिक टन साखरेचा करार केला. २ लाख ३३ हजार मे. टन साखर विक्री केली. आपला सौदा चांगला राहिला. पुढच्या हंगामात एक दीड लाख टन साखर साठा ठेवावा लागणार आहे. त्याचा फायदा होणार आहे. उसाचा एफआरपी दर ठरविताना राज्यसरकारने जुना कायदा मोडीत काढून शेतकऱ्यांना एक टनास १० टक्के प्रमाणे साखर उताऱ्याला दर निश्चित करून पुढील प्रत्येक टक्का उताऱ्याला दहा टक्के प्रमाणे वेगळा दर देण्याचा शेतकऱ्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे.

ना. काळे पुढे म्हणाले, वेळेवर व चांगल्या पावसामुळे ऊसाचे टनेज वाढले सरासरी एकरी ८३ असताना ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कमी असल्यामुळे सर्वच कारखानदारांना ऊसगाळप करणे अडचणीचे झाले आहे. प्रशासनाने हार्वेस्टर चे नियोजन केल्यामुळे वेळेच्या आत सर्व उसाचे गाळप करता आले. पुढच्या हंगामात सुद्धा अतिरिक्त ऊस असल्यामुळे हंगाम उच्चांकी ठरणार आहे. त्यावेळी सुद्धा मजुरांची कमतरता जाणवणार आहे तेव्हांही हार्वेस्टर हाच एकमेव उपाय राहणार आहे हे लक्षात घेऊन शेती विभाग आणि आत्तापासूनच तयारीला लागावे व शेतकऱ्यांनी उसाची लागवड त्या पद्धतीने केली पाहिजे. आणि वेळेस ऊसाची नोंद केल्यास अडचणी येता. तेंव्हा उसाची नोंद वेळेआधी करावी त्यामुळे अंदाज बांधून नियोजन करता येईल. शेतीसाठी जादा पाणी उपलब्ध करण्यासाठी आपले प्रयत्न चालू असून जादा पाणी उपलब्ध करून देऊ तेव्हा उसाची लागवड करा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम नारायण मांजरे, आनंदराव चव्हाण, देवराम दवंगे, कारभारी आगवन, कचरू पाटील घुमरे, पद्माकांत कुदळे, बाबासाहेब कोते, अनिल शिंदे, स्नेहल शिंदे,छाया आहेर, भिकाजी सोनवणे, दिलीप शिंदे, सचिन चांदगुडे, मधुकर टेके,देवराम दवंगे, अधिकारी सुनील कोल्हे,बी.बी.सय्यद, डी.व्ही.आभाळे, डी.जी.चव्हाण, ताकवणे, एन.बी. गांगुर्डे, एस.एस. बोरणारे, ए.व्ही. कापसे, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले.तर शेवटी आभार संचालक बाळासाहेब बारहाते यांनी मानले.

चौकट

एफआरपी प्रमाणे आपला भाव २२०६ रुपये निघत असताना आपण २५०० रुपये दिले. याबाबत अनेकांनी आपल्याला हा भाव देण्याची काय गरज होती असा प्रश्नही केले असल्याचे सांगताना आता सर्व हिशोब करून येत्या दहा दिवसाच्या आत १०० रुपये प्रति टन भाव देणार असल्याचे नामदार आशुतोष काळे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page