शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीत सोसायटयांचा मोलाचा वाटा-बिपीन कोल्हे 

शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीत सोसायटयांचा मोलाचा वाटा-बिपीन कोल्हे

Societies play an important role in the economic upliftment of farmers – Bipin Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 14 June, 17.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : सहकारी सोसायटया हया शेतक-यांच्या विकासाच्या धमन्या असुन त्यांच्या आर्थीक उन्नतीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

 प्रारंभी विलासराव वाबळे यांनी प्रास्तविक केले. मोहनराव वाबळे यांनी कोल्हे कुटूंबियांच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली.           

याप्रसंगी सर्वश्री. विलास वाबळे, गणेश वाबळे, सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, प्रशांत वाबळे, राजेंद्र वाबळे, गोरख कदम, सोपानराव कदम, शंकरराव कदम, कुमार मेहेरखांब, कुसुमबाई वाबळे, रंजना कदम, राजेंद्र हळनोर यांचा सत्कार करण्यांत आला. या सोसायटीच्या निवडणुकीत विजयश्री खेचुन आणण्याकामी सर्वश्री. छबुराव माळी, पांडुरंग वाबळे, सोपानराव सोनवणे, यशवंत निकम, दिपकराव हुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याबददल त्यांचाही सत्कार करण्यांत आला.           

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेमार्फत सहकारी सोसायटयांना मोठया प्रमाणांत आर्थीक पाठबळ दिले जाते. गांवपातळीवर सभासद शेतक-यांना उदभवणा-या अडचणी सोडविण्यांचे काम सोसायटी व त्यांचे सर्व संचालक प्राधान्याने करत असतात. गेल्या दोन वर्षापासुन पर्जन्यमान चांगले होत असल्याने शेतकरी वर्गाला हंगामनिहाय शेती पीक कर्ज देवुन त्याच्या वसुलीसाठीही सर्वांनीच सहकार्य करावे. शेतक-यांनी कर्जाची परतफेड नियीमत करावी. स्वतःबरोबरच संस्थेच्या नांवलौकीकात भर घालावा त्यात भेदभाव करू नये.

शेवटी संचालक विलासाराव वाबळे यांनी आभार मानले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page