हद्दवाढ झालेल्या भागाच्या समस्या तातडीने सोडवा- ना.आशुतोष काळे

हद्दवाढ झालेल्या भागाच्या समस्या तातडीने सोडवा- ना.आशुतोष काळे

Promptly solve the problem of boundary area – Na. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 14 June, 16.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव शहराच्या लगतच्या उपनगरातील नागरिकांच्या रस्ते, पाणी,आरोग्य व स्वच्छता आदी बाबत अनेक समस्या असून हद्दवाढ झालेल्या भागाच्या समस्या तातडीने सोडवून विकासाचे प्रश्न मार्गी लावा अशा सूचना ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

नामदार आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत नागरिकांनी उपस्थित केलेल्या विकासाच्या अनेक समस्यांचा आढावा घेऊन ना.आशुतोष काळे यांनी पालिका प्रशासनाला सूचना दिल्या.

ना. काळे पुढे म्हणाले की,नागरिक पालिकेला कर भरतात त्या करापोटी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे पालिकेचे कर्तव्यच नाही तर जबाबदारी देखील आहे. शहरातील नागरिकांप्रमाणेच रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता या सोयीसुविधा हद्दवाढ झालेल्या उपनगरातील नागरिकांना देखील मिळाल्या पाहिजेत, तो त्यांचा अधिकार आहे. या नागरिकांचे समस्या गांभीर्याने घेऊन त्या तातडीने कशा मार्गी लावता येतील यासाठी प्रयत्न करा. अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करा अशा सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला यावेळी दिल्या. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ समतानगर व परिसरातील नागरिकांनी ना. आशुतोष काळेंचे आभार मानले आहे. यावेळी यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नायब तहसीलदार श्रीमती गोरे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, वीज वितरण कंपनी अभियंता यद्नेश शेलार, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, आरोग्य अधिकारी डॉ. गायत्री कांडेकर, शिक्षण प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पठारे, आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page