कंटेनर दुचाकी अपघातात एक तरूण ठार,

कंटेनर दुचाकी अपघातात एक तरूण ठार,

A young man killed in a container bike accident.

कोपरगाव येवला रोडवर बनकर वस्तीजवळील घटनाIncident near Bunkar Vasti on Kopargaon Yewla Road

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 18July, 20.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव येवला महामार्गावर बनकर वस्ती जवळ दुचाकीवरून जाणाऱ्या दुचाकीस्वारास पाठीमागून कंटेनर ने दिलेल्या जबरदस्त धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे.

१८ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, खिर्डी गणेश येथील सचिन काशिनाथ रोहम (३०) हे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास शिर्डी येथील दवाखान्यात आपले आजारी मुलीला भेटण्यासाठी दुचाकीवरून जात असताना बनकर वस्ती जवळ पाठीमागुन येवल्याकडून भरधाव वेगाने येणा-या यू.पी.७८डि.एन. ९०९१ या कंटनेर हिरो होंडा सीडी डीलक्स ए. एल. २९७५ या दुचाकी वरील ३० वर्षीय इसमाला चिरडले. अशी फिर्याद महेश हरिभाऊ रोहम यांनी कोपरगाव शहर पोलिसात दिली आहे सदर फिर्यादीवर कोपरगाव शहर पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे. शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर ठोंबरे हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page