वनिता मंडळ अध्यक्ष वंदना चिकटे तर शैला लावर उपाध्यक्ष
Vanita Mandal President Vandana Chikte and Shaila Lavar Vice President
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 19July, 18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव :वनिता मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वंदना जगमोहन चिकटे (अध्यक्षा), शैला बाळकृष्ण लावर (उपाध्यक्षा)वृषाली विनीत किर्लोस्कर (सचिव) आदींसह नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदावरन बोलताना भाजपच्या प्रदेश सचिव ,स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी.भविष्यकाळाचा विचार न करता,दुखः कष्टी न होता केवळ वर्तमानात जगण्याची सवय प्रत्येक महिलेने अंगीकारावी.आज समाजातील विविध क्षेत्रात महिला उंच भरारी घेत आहे. त्यांचे कार्य समाजाला आदर्शवत व कौतुकास्पद आहे असेही त्या येथील ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात वनिता महिला मंडळाच्या नूतन कार्यकारणी पदग्रहण समारंभ व दहावी बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थाचा गुणगौरव समारंभात म्हणाला .
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून समता ग्रुपच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे होत्या. मंडळाच्या विविध पदाधिकारी यांनी यावेळी पदग्रहण केले.यावेळी सुधाभाभी ठोळे,संगीता मालकर,डॉ. वर्षा झंवर,विमल पुंडे,रेणुका नाईक ॲड श्रद्धा जवाद ,ॲड स्मिता जोशी, भावना गवांदे, रुपाली गुजराथी,राजश्री जाधव, डॉ. दिपाली आचारी,सपना मोरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविकात नूतन अध्यक्षा वंदना जगमोहन चिकटे म्हणाल्या, मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “वनिता मंडळाची भरारी” हे मासिक संपादन करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी, आरोग्य विषयक व्याख्याने, मुलीचे जन्माचे स्वागत,कोजागिरी, वासंतिक रसपान आदि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. सामाजिक बांधिलकीतून पोलीस अधिकारी, कारागृहातील कैदी,पत्रकार यांच्यासह शासनाच्या विविध अधिकारी, कर्मचारी यांच्या राखीबंधनाचा कार्यक्रम यावर्षी घेण्यात येणार आहे. महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना लाड यांनी तर आभार शैलजा लावर यांनी मानले.
वनिता मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निवड झालेली नूतन कार्यकारणी खालीलप्रमाणे -वंदना जगमोहन चिकटे (अध्यक्षा),शैला बाळकृष्ण लावर (उपाध्यक्षा)वृषाली विनीत किर्लोस्कर (सचिव)आरती सचिन महाजन (सहसचिव)वैदेही विराज किर्लोस्कर (खजिनदार) विद्या सुनील गोखले(सहखजिनदार) ,स्वाती मुळे ,हर्षदा पटवर्धन ,मीना भालेराव,रंजना कुलकर्णी, विशालाक्षी शालिग्राम ,माधवी नेने (सदस्य) श्रीमती नलिनी पटवर्धन ,रजनीताई गुजराथी, पुष्पलता सुतार ,शैलजा रोहोम (सल्लागार समिती)





