कोपरगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्टचे काम सुरू
Lift work started at Kopargaon railway station
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 21July, 18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव – कोपरगाव रेल्वे स्टेशनसाठी मंजूर असलेल्या लिप्टचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी रेल्वे विभागाकडे केली होती.त्या मागणीची दखल घेवून कोपरगाव रेल्वे स्टेशनवर लिप्टचे काम सुरू करण्यात आले आहे.
रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी फेब्रुवारी महिन्यात दि.२५ रोजी कोपरगाव दौऱ्यावर आले होते.
त्यावेळी ना.आशुतोष काळे यांनी त्यांची भेट घेवून रेल्वे प्रवाशांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर सातत्याने येत असलेल्या विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्यामध्ये विशेषत: रेल्वेच्या डबल लाईनचे काम सुरु असून उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या सर्व रेल्वे प्लॅटफॉर्म (फलाट) नंबर २ वर थांबणार आहे. लिफ्ट अभावी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कोपरगांव रेल्वे स्टेशनला मंजूर असलेल्या लिप्टचे काम तातडीने सुरु करावे ही देखील मुख्य मागणी होती.त्यावेळी सर्व मागण्यांचा रेल्वे प्रशासन सकारात्मकपणे विचार करून प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन बांधील आहे अशी ग्वाही जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांनी ना.आशुतोष काळे यांना दिली होती.
त्याची तातडीने अंमलबजावणी करतांना रेल्वे प्रशासनाने कोपरगाव रेल्वे स्टेशनवर लिप्टचे काम हाती घेतले आहे.त्यामुळे रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार असल्यामुळे रेल्वे प्रवाशांनी ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.





