कोपरगाव ब्राह्यण सभेकडून समिरण जोशी याचा गौरव
Honored by Samiran Joshi from Kopargaon Brahyan Sabha
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 6 Aug, 16.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : येथिल जेष्ठ विधीज्ञ अॕड.जयंतराव जोशी यांचे चिरंजीव संगणक अभियंता समिरण जोशी यांची अमेरिका साॅल्टलेक (सिटी) युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक शिक्षण आणि सेमी कंडक्टर यातील संशोधनासाठी निवड झाल्याबददल कोपरगाव ब्राह्मण सभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात अध्यक्ष मकरंद को-हाळकर म्हणाले, समिरणची निवड आपल्या सर्वाच्या दृष्टीने खुप अभिमानाची गोष्ट आहे. त्याला या क्षेत्रात काम करायला मिळते ही एक प्रकारची देश सेवाच असल्याचे त्यांनी सांगितले .
माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी समिरण याला त्यांच्या घरातुन आई वडील यांच्याकडून गुणवत्तेचा वारसा मिळाला असल्याने विद्वत्तेची परंपरा त्याने पुढे सुरू ठेवली आहे त्या बाबत त्याचे कौतुक करुन त्याला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार उत्तर देताना समिरण म्हणाला हा घरातला सत्कार असल्याने त्याचे महत्व माझ्या दृष्टीने मोठी आहे असे ऋणनिर्देश व्यक्त करून संशोधना विषयी माहीती दिली.
समिरण जोशी यांचे माजी अध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी ,माजी नगराध्यक्षा सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,ब्राह्यण सभा बांधकाम समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक आदीनी अभिनंदन केले आहे.
आभार ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी यांनी मानले.
समिरण हा अमेरिका येथील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक, सेमी कंडक्टर (हे संगणक नासा/ईस्रो वापरतात) या विषयावर संशोधन करणार आहे. १६ ऑगस्टला समीरण अमेरिकेला रवाना होत आहे.
समीरण जेष्ठ विधीज्ञ ॲड.जयंत व ॲड.सौ.स्मीता जोशी यांचा मुलगा तर प्रगतशील शेतकरी व गोसेवक धनंजय व सौ.दिपश्री जोशी आणि श्रीनिवास ट्रेडर्सचे संचालक मकरंद व सौ.मिताली जोशी यांचा पुतण्या आहे.
या कार्यक्रमाला ब्राह्यण सभेचे माजी अध्यक्ष संजीव देशपांडे , संघटक महेंद्र कुलकर्णी, तसेच बाळासाहेब कुर्लेकर, समीर कुलकर्णी, एस.पी. कुलकर्णी, माधव जोशीसर, सौ.मंगला ठोंबरे सौ.कुलकर्णी, सौ.वाडेकर, प्रसाद ठोंबरे आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views:
567





