ना.काळेंच्या सल्ल्यामुळेच कोपरगाव बाजार समितीची  अर्थिक भरभराट  – बागरेचा

ना.काळेंच्या सल्ल्यामुळेच कोपरगाव बाजार समितीची  अर्थिक भरभराट  – बागरेचा

Kopargaon Bazar Samiti’s financial prosperity is due to Kale advice – Bagrecha

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 6 Aug, 18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा, डाळिंब व भुसार मालाची सुट्या पद्धतीने खरेदी करण्याचा सल्ला ना. आशुतोष काळे यांनी दिल्यामुळेच बाजार समितीची भरभराट झाली असल्याचा गौप्यस्फोट  महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे .

बागरेचा यांनी पुढे म्हटले आहे की, कोपरगाव कृषी बाजार समिती अडचणीतून जात होती. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ७५ लाखावर आले होते. अशा बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असतांना  ना.  काळे यांनी २०१७ ला सर्व सर्वपक्षीय संचालक मंडळ, व्यापारी यांची संयुक्त बैठक घेवून अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी संचालक मंडळाला मार्गदर्शन करतांना त्यांनी गोणी पद्धत बंद करून सुट्या पद्धतीने कांदा, डाळिंब व भुसार मालाची खरेदी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेला प्रतिसाद देत सर्व पक्षीय संचालक मंडळाने कांदा, डाळिंब व भुसार मालाची सुट्या पद्धतीने खरेदी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून बाजार समितीची आर्थिक उलाढाल वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
सध्या नियमितपणे ५०० च्या वर वाहनातून शेती माल विक्रीसाठी बाजार समितीत येत आहे. येवला, राहाता, श्रीरामपूर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे जावून कोपरगाव बाजार समितीने व्यवसाय केला आहे. त्यामुळे ७५ लाखावर आलेले वार्षिक उत्पन्न आज ३ कोटीच्या आसपास पोहोचले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची भरभराट होवून शेतकरी, व्यापारी व हमाल पंचायतला चांगले दिवस आले आहेत. असे  बागरेचा यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page