प्रेम विरक्त असेल तर भगवंत प्रकट होतात- महंत रामगिरी महाराज
If love is absent, God appears – Mahant Ramgiri Maharaj
श्री श्रेत्र कोकमठाणच्या १८० एकर क्षेत्रात हा भव्य दिव्य सप्ताह पार पडला. This grand divine week was held in the 180 acre area of Sri Shretra Kokamthan.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 9 Aug, 20.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : भक्त आणि भगवंत प्रेम जिवाशी असते. प्रेम विरक्त असेल तर भगवंत प्रकट होतात. विरहानुरागात परमेश्वराच्या विरहाचे वर्णन आहे. भगवंत भेटीसाठी गोपिका व्याकुळ झाल्या असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी मंगळवारी १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी काल्याच्या कीर्तनात केले.
काल्याच्या किर्तनासाठी महंत रामगिरी महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची कृष्णे वेधियेली विरहीणी बोले। चंद्रमा करितो उबा राहे माये॥ ही गौळण निरुपणासाठी घेत महाराजांनी श्रीकृष्णाचे गोकुळवासियांचे प्रेम, त्यांची भक्ती, श्रीकृष्णाच्या रुपाचे वर्णन महाराजांनी करत गायनातुन अवघा भाविक ही थिरकविला. अनुराग, मिलनानुराग आणि विरहानुराग यांचे स्पष्टीकरणही केले. ते म्हणाले, पुर्वनुरागात भगवंत दर्शनाची तीव्र इच्छा असते, पण ती पुर्ण होत नाही. मिलनानुरागात दर्शनाची तीव्र इच्छा असते. असे सांगत महाराज म्हणाले, भक्त आणि भगवंत प्रेम जिवाशी असते.
काल्याच्या किर्तनात श्रीकृष्णाचे वर्णन करतांना महाराज म्हणाले, जो चित्ताचे आकर्षण करतो, तो कृष्ण. भक्ताच्या चित्ताला कृष्ण आकर्षीत करतो. जगातले सर्व सुंदर पदार्थ भगवंतापुढे फिके आहेत. भगवंताच्या वेणुचे स्वराचा आवाजाचा संपुर्ण भ्रमांडावर परिणाम होतो. असे वर्णन करत महाराजांनी गोपिकांच्या मनाची स्थिती भाविकांपुढे मांडली. श्रीकृष्णाच्या लिलांच्या बाबत गैरसमज असले तरी भगवंताच्या त्या लिला आहेत. भगवंत ही चिरहरण लिला करतात. मग रासलिला करतात. भगवंताने चोरी केली नाही, ती भगवंताची चौर्य लिला होती. ती प्रेमासाठी होती. प्रेमाच्या भांडणात जसा आनंद आहे. तसा प्रेमाच्या चोरीतही आहे. असे सांगत नवरा बायकोच्या प्रेमाच्या भांडणाचा प्रसंग सांगत महाराजांनी उपदेशही केला. गोपि भगवंतासाठी रडत होत्या.
त्यावर महाराज म्हणाले, भगवंता करता रडतो, त्याचे गित होते. गोपी रडल्या, संसार रडवितो.या सप्तहाला भक्तीचा महापूर लोटला आहे. हे पाहुन पांडूरंग पढरीत नाही. ते येथे आलेत, परमात्म्याला पाहाण्यासाठी दिव्य चक्षु पाहिजे. पांडूरंग म्हणतात जेथे भक्त जातात तेथे मी आहे. हे सदगुरु योगिराज गंगागिरी महाराजांच्या तपस्येचे फळ या सप्ताहात सात दिवस भगवंत चिंतन केले. काही काळ धो धो पाऊस आणि कडक उन असतानेही भाविकांची भक्ती टिकून आहे.
याप्रसंगी अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे भाषणे झाली.
या सोहळ्यास ओरिसाच्या खासदार मजुलता, भाजपाच्या धार्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले, महंत रमेशगिरी महाराज, ओम गुरुदेव जुंगलीदास आश्रमाचे परमानंद महाराज, गिरीजानंदन, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, लक्ष्मीमाता दूधचे बाबासाहेब चिडे,अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्हाडे, संदिप पारख, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे, डॉ. राजेंद्र पिपाडा, सिध्दार्थ मुरकूटे, ममता पिपाडा, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष साबेरभाई खान, सप्ताहाचे अध्यक्ष सुधाकर रोहोम, कार्याध्यक्ष संभाजी रक्ताटे, सचिव शरद थोरात, रंगनाथ लोढे, सचिन जगताप, दत्तु खपके, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, बाळासाहेब रंजाळे महाराज, भगवान डमाळे महाराज, नवनाथ महाराज आंधळे, चंद्रकांत महाराज सावंत, गणेश महाराज शास्त्री, मधुसूदन महाराज, भाउसाहेब महाराज, यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लाखो भाविक उपस्थित होते.
चौकट
या सप्ताहात ४०० पोती साखरेची बुंदी तयार करण्यात आली होती. तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कापसे पैठणीच्या वतीने बाळासाहेब कापसे यांनी ६०० पोती चिवडा देण्यात आला होता. या सर्व महाप्रसादाचे वाटप २५० ट्रॅक्टरद्वारे करण्यात आले. यासाठी १० हजार वाढपी भाविकांच्या दिमतीला होते. सर्वांना प्रसाद मिळाला.
Post Views:
249