अतिवृष्टीतील संकटग्रस्तांना विवेक कोल्हेकडून मदतीचा दिलासा
Relief from Vivek Kolhe to those affected by heavy rains
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 9 Aug, 20.50
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : सोमवारी सायंकाळी अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरातील अनेक भागात घरामध्ये आणि दुकानामध्ये पाऊसचे पाणी शिरले, या पाण्यामुळे शेकडो कुटुंबाचे संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले व व्यापऱ्याचे दुकानातील माल खराब झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. या संकटाच्या प्रसंगी नगरपरिषद आणि प्रशासकिय यंत्रणा वेळीच नगरिकाना मदत करण्यास असमर्थ ठरली, अशा वेळी नेहमीच कोपरगावकरांच्या संकटात धावून येणाऱ्या संजीवनी उद्योग समूहाला नागरीकांनी साद घातली, ही परिस्थिति समजताच सहकार महर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी तातडीने संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला सोबत घेऊन आपत्तीग्रस्तांना मदत करून आपदग्रस्तांना दिलासा दिला, रात्रीउशिरापर्यंत विवेक कोल्हे याांनी नागरिकांना आधार देत परिस्थिति आटोक्यात आणण्याचे काम केले.
युवा नेते विवेक कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः आपत्तीग्रस्तांच्य घरात आणि दुकानांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मदत केली तसेच आपत्तीग्रस्तांच्य जेवणाची व्यवस्था केली.
जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. राहत्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना मोठा फटका बसला.नगर परिषद आणि प्रशासकीय यंत्रणा अशा संकटाच्या वेळी नागरिकांना मदत करण्यात असमर्थ ठरले, नेहमी प्रमाणे विवेक कोल्हे आणि त्यांचे सहकारी आपदग्रस्तांच्या मदतीला तत्काळ धावून आले. विवेक कोल्हे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर शहरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्तांना मदत केली आणि त्यांना दिलासा दिला. शहरातील संजय नगर, वडार गल्ली,बौद्ध विहार परिसर, भुजारी गल्ली, बस स्टँडच्या मागील संपूर्ण परिसर, आयेशा कॉलनी, सुभाष नगर आदी ठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. प्रत्येकाच्या घरामध्ये कमरे इतके पाणी साचले होते. जोरदार पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली होती. अशा वेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्वतः रात्री साडेनऊ वाजता कमरे इतक्या पाण्यामध्ये संजय नगर परिसराची पाहणी केली आणि सर्व नागरिकांना धीर दिला ज्यांना घरात राहणे शक्य नव्हते त्यांना कृष्णाई मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली तसेच जेवणाची व्यवस्था केली.
ज्या व्यापारांच्या दुकानांमध्ये तळघरात पाणी जाऊन नुकसान झाले त्यांना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आपत्ति व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाच्या मदतीने सर्व पाणी बाहेर काढण्यासाठी मदत केली.
तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याशी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संपर्क करून तातडीने पंचनामे करावे, अशा सूचना दिल्या,. तसेच प्रत्येकी कुटुंबाला दहा हजार रुपये मदत देण्याबाबत शासकीय स्तरावर असलेल्या योजनेचा आधार घेऊन सूचना केल्या.
याप्रसंगी यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, संदीप देवकर, जितेंद्र रणशूर, अल्ताफ कुरेशी, खलीक कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, सलीम अत्तार, बाळासाहेब दवंगे, सतीश चव्हाण, दगडू गुंजाळ, विजय चव्हाणके, देवराम पगारे, सर्व आजी माजी विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजप व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.